लवकरच येतोय OnePlus फोनचा स्पेशल व्हेरियंट; वाचा किंमत-फीचर्स

 oneplus nord
oneplus nordGooglee

OnePlus च्या नवीन गेमिंग स्मार्टफोन OnePlus Nord 2 PAC-MAN Edition साठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. कंपनी हा दमदार स्मार्टफोन भारत आणि युरोपमध्ये येत्या १५ नोव्हेंबरला लॉन्च करू शकते. लॉन्च होण्यापूर्वीच या आगामी स्मार्टफोनचे पेज Amazon वर लाइव्ह झाले आहे. दरम्यान फोनच्या 12 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत 37,999 रुपये असणार आहे

कंपनीने हा फोन जपानी व्हिडिओ गेम कंपनी Bandai Namco च्या सोबत मिळून तयार केला आहे. फोनला PAC-MAN थीमवर कस्टमाईज UI, प्रि इंस्टॉल्ड PAC-MAN 256 गेम, सिस्टम इंटिग्रेटेड चॅलेंज कस्टम कॅमेरा फिल्टर्स आणि मागील पॅनलवर एक अतिशय खास डिझाइन मिळेल. वनप्लसचा हा पहिला स्मार्टफोन आहे जो विशेष इन बिल्ट गेमिंग थीम आणि हार्डवेअर डिझाइनसह येईल.

फोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंच फुल एचडी + फ्लुइड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशो आणि 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. फोनमध्ये दिसणारा डिस्प्ले पंच-होल डिझाइन आणि पातळ बेझल्ससह देण्यात येईल. त्याच वेळी, फोनच्या मागील पॅनलवर निऑन PAC-MAN लोगो दिलेला आहे, जो अंधारात चमकतो.

 oneplus nord
गुगलचा नवा नियम आजपासून लागू; सर्वच वापरकर्त्यांसाठी असेल अनिवार्य

मिळेल 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा

फोनमध्ये कंपनी 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटरनेट स्टोरेज देण्यात येईल. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Snapdragon 778G चिपसेट देणार आहे. तसेच फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिले आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला जाईल. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

फोनमध्ये पॉवरसाठी 4500mAh बॅटरी दिली आहे, जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 11 वर काम करेल. तसेच फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय दिले जाऊ शकतात.

 oneplus nord
Lava ने लॉंच केला देशातील पहिला स्वदेशी 5G स्मार्टफोन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com