esakal | Motorolaचे दोन नवे स्मार्टफोन लॉंच, स्वस्तात मिळतील दमदार फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Moto E40 आणि Moto G Pure

Motorolaचे दोन नवे स्मार्टफोन लॉंच, स्वस्तात मिळतील दमदार फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मोटोरोला कंपनीने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन Moto E40 आणि Moto G Pure बाजारात लॉंच केले आहेत. कंपनीने युरोपमध्ये E40 तर Moto G Pure अमेरिकेत लॉंच केला. युरोपमध्ये लॉन्च केलेल्या मोटो E40 ची किंमत 149 युरो (सुमारे 12,900 रुपये) असून हा फोन चारकोल ग्रे आणि क्ले पिंक कलर ऑप्शन मध्ये मिळणार आहे, महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन भारतात 12 ऑक्टोबर रोजी लाँच होईल.

Moto G Pure बद्दल बोलायचे झाले तर या फोनची किंमत $ 159 (सुमारे 12 हजार रुपये) असून अमेरिकेत या फोनची विक्री 14 ऑक्टोबरपासून सुरू होईल. कंपनी येत्या काही दिवसांमध्ये हा फोन कॅनडामध्ये उपलब्ध करून देणार आहे. मात्र हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल की नाही याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

Moto E40 चे स्पेसिफीकेशन्स

फोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले दिला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असून फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Unisoc T700 ऑक्टा-कोर चिपसेट मिळेल. मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट असलेल्या या फोनला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये दिलेला प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. Moto E40 मध्ये 4000mAh ची बॅटरी दिली असून कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी एका चार्जवर 40 तासांचा बॅकअप देते.

हेही वाचा: ५ लाखांपेक्षा कमी किंमतीत या आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या कार

Moto G Pure चे स्पेसिफीकेशन्स

या फोनमध्ये, कंपनी 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच HD + IPS TFT LCD ऑफर करत आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20: 9 आणि पिक्सेल डेन्सिटी 269ppi असून कंपनीने हा फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला आहे. कंपनी या फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर देत आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये सिंगल एलईडी फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. सेल्फीसाठी कंपनी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.तसेच फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला फोनमध्ये 4G LTE, WiFi 802.11ac, Bluetooth version 5, USB Type-C port, GPS आणि 3.5mm हेडफोन जॅकसारखे पर्याय मिळतील.

हेही वाचा: नवरात्रीत उपवास कारताय 'हे' अ‍ॅप घेतील तुमच्या आरोग्याची काळजी

loading image
go to top