esakal | टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही Punch लवकरच होणार लॉंच; पाहा फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

tata punch

टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही Punch लवकरच होणार लॉंच; पाहा फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motars) च्या सर्वात लहान एसयूव्ही पंच (Punch) बद्दल सध्या सर्वत्र जोरात चर्चा सुरु आहे. टाटा पंच मायक्रो एसयूव्ही सेगमेंट मध्ये लॉंच केली जाणार आहे. या मॉडेलचे अधिकृत फोटो कंपनीने यापूर्वीच प्रसिध्द केले आहेत, ज्यामध्ये डिझाइन बद्दलच्या डिटेल्सचा खुलासा करण्यात आला आहे. टाटा कंपनीकडून या एसयूव्हीच्या बुकिंग आणि लॉंचची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही मात्र, ही मायक्रो एसयूव्ही (Micro SUV) ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात विक्रीसाठी शोरूममध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पंच एसयूव्हीचे बुकिंग सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

HBX संकल्पनेवर आधारित पंच ही टाटाची देशातील सर्वात लहान आणि किफायतशीर SUV असेल. या एसयूव्हीमध्ये मॉडेलच्या आधीच्या डिझाइन मधील इलेमेंट कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र गाडीचा मागील भाग थोडा कमी करण्यात आला आहे. तसेच या नव्या मायक्रो एसयूव्हीमध्ये ह्यूमन लाइन ग्रिल आणि स्प्लिट हेडलॅम्प सेटअप डिझाईन पाहायला मिळते. चारही बाजूंनी हेवी बॉडी क्लॅडिंग, स्क्वायर व्हील आर्च आणि अपराइट स्टांस या एसयूव्हीला वेगळा लूक मिळवून देतात. तसेच फ्रंट बम्पर खाली टोन केले गेले असून सिग्नेचर वाय डिझाइन मोटिफ्स आहेत.

सध्या टाटा पंचच्या इंटिरीयर बद्दल अजून काही माहिती मिळालेली नाही. पण गाडीचे इंटिरीयर एचबीएक्स कन्सेप्ट वर आधारीत असू शकते, ज्यामध्ये डॅशबोर्ड डिझाइनमध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असेल. हे काही बिट्समध्ये Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकसारखेच असू शकते. ज्यामध्ये फ्लॅट-बॉटम, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, डिजिटल टॅकोमीटर आणि अॅनालॉग स्पीडोमीटरसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, HVAC कंट्रोल आणि बरेच फीचर्स देण्यात येतील.

हेही वाचा: Realme 8i Vs Redmi 10 Prime : कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? वाचा

टाटा कंपनीच्या सर्वात किफायतशीर SUV पंचच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या गाडीत दोन पेट्रोल इंजिन पर्याय देऊ शकते. लोअर व्हेरिएंट 1.2L, 3-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड गॅसोलीन युनिटसह येण्याची शक्यता आहे जे 83bhp पॉवर जनरेट करेल, तर पंचच्या हायर ट्रिम्स मध्ये 1.2L टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटर असेल. जी 100bhp ची पावर जनरेट करेल. आगामी टाटा मिनी एसयूव्ही 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्ससह दिले लॉंच केली जाऊ शकते.

हेही वाचा: सीएनजी पेक्षा बेस्ट मायलेज देतात 'या' इलेक्ट्रिक कार; पाहा डिटेल्स

loading image
go to top