esakal | सीएनजी पेक्षा बेस्ट मायलेज देतात 'या' इलेक्ट्रिक कार; पाहा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Nexon EV

सीएनजी पेक्षा बेस्ट मायलेज देतात 'या' इलेक्ट्रिक कार; पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सध्या इलेक्ट्रिक कार खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. त्यामुळेच अनेक कार बनवणाऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक कार बाजारात घेऊन येत आहेत. यामधील बऱ्याच कार एकदा पूर्ण चार्ज केल्यास त्या न थांबता 312 ते 452 किलोमीटर पर्यंत धावू शकतात. या इलेक्ट्रिक कारमध्ये सीएनजी कारपेक्षा देखील जास्त मायलेज मिळते. म्हणजेच एक किलोमीटर प्रवास करण्यासाठी तुम्ही पेट्रोल-डिझेल किंवा सीएनजी कारसाठी जितका खर्च करता त्यापेक्षा कमी खर्च इलेक्ट्रिक कारला येतो. त्यामुळे तुम्हाला आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतींची चिंता करण्याची गरज पडणार नाही.आज आपण अशाच काही बेस्ट कार बद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरुन तुम्ही तुमच्या बजेटमध्ये आवडीची इलेक्ट्रिक कार निवडू शकता.

टाटा नेक्सन EV (Tata Nexon EV)

टाटा नेक्सन ईव्ही कारमध्ये परमनंट मॅग्नेट एसी मोटर देण्यात आली आहे. यात पॉवरसाठी 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी आहे, जी लिक्विड कूल्ड आणि IP67 सर्टिफाइड आहे. त्यामुळे ही बॅटरी पाणी आणि धूळ यामुळे खराब होत नाही. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 312 किमीची रेंज देते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार न थांबता 312 किलोमीटर चालते. स्पीडबद्दल सांगयचे झाल्यास, ही कार 9-9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठते.

फास्ट चार्जर वापरुन ही इलेक्ट्रिक कार केवळ 60 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते. तसेच होम चार्जरसह फुल चार्ज करण्यासाठी कारला 8 तास लागतात. या कारची स्टार्टींग एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे.

हेही वाचा: काय असेल iPhone 13 Pro Max ची किंमत आणि फीचर्स? पाहा डिटेल्स

2021 Tata Tigor EV

ही इलेक्ट्रिक कार Ziptron पॉवरट्रेन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या कारमध्ये तुम्हाला लिथियम-आयन बॅटरी मिळेल, जी आयपी -67 सर्टिफिकेट आणि 8 वर्षांच्या वॉरंटीसह येते. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 306 किमी पर्यंतची चालते. Tigor EV मध्ये पॉवरसाठी 26 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. या गाडीत मॅगनेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर मॅक्झिमम 73 बीएचपीची पॉवर आणि 170 Nmची पीक टॉर्क जनरेट करते. स्पीडबद्दल बोलायचे झाले तर ही कार 5.7 सेकंदात 0-60 किमी प्रतितास स्पीड गाठते.

कारमध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हर्मन ऑडिओ सिस्टम, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील आणि सीटवर प्रीमियम अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. यात iRA कनेक्टेड कार टेक दिली आहे, जे Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरु होते.

हेही वाचा: Realme 8i स्मार्टफोन भारतात लॉंच; पाहा किंमत आणि फीचर्स

ह्युंदाई कोना (Hyundai Kona)

ह्युंदाई कोना कारमध्ये 39.2 kWh ची बॅटरी दिली आहे. तसेच पॉवरसाठी 100 किलोवॅटची मोटर आहे, जी मॅक्झिमम 131 बीएचपी आणि 395 Nmचा पीक टॉर्क जनरेट करते. स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ही कार 9.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठते. या कारमध्ये तीन राईडिंग मोड - इको/इको प्लस, कम्फर्ट आणि स्पोर्टचा. ही इलेक्ट्रिक कार पूर्ण सिंगल चार्जवर 452 किमी पर्यंत चालते. सामान्य चार्जरच्या मदतीने कार चार्ज 8 तासात पूर्णपणे चार्ज होते. या कारची एक्स-शोरूम किंमत 23.79 लाख रुपये आहे, जी 23.98 लाख रुपयांपर्यंत जाते.

2021 MG ZS EV

ही इलेक्ट्रिक कार 419 किमीची रेंज देते. तसेच या कारमध्ये पर्मनंट सिक्रोनस मोटाराल पावर देण्यासाठी 44.5 kWh हाय-टेक IP6 सार्टिफाइज बॅटरी पॅक देण्यात आला आहे . तसेच याची मोटर 141 bhp ची मॅक्झिमम पावर आणि 353 Nm ची पीक टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक कार फक्त 8.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठते. स्टँडर्ड एसी चार्जरच्या मदतीने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 6 तासात पूर्ण चार्ज होते. तर 50kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने ही SUV फक्त 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. या कारची एक्स शोरुम किंमत 13.49 रुपयांपासून सुरु होते.

हेही वाचा: कमी किंमतीत भरपूर स्पेस, कमर्शियल वापरासाठी या कार आहेत बेस्ट

loading image
go to top