esakal | Realme 8i Vs Redmi 10 Prime : कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? पाहा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

Realme 8i Vs Redmi 10 Prime

Realme 8i Vs Redmi 10 Prime : कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? वाचा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Realme 8i Vs Redmi 10 Prime : भारतामध्ये स्मार्टफोन बाजारात Realme आणि Xiaomi या दोन फोन कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळते आहे. अलीकडेच दोन्ही स्मार्टफोन कंपन्यांनी Realme 8i आणि Redmi 10 Prime लाँच केले आहेत. आता प्रश्न हा आहे की दोन स्मार्टफोन्सपैकी कोणता फोन बेस्ट आहे? आज आपण Realme 8i आणि Redmi 10 Prime च्या फीचर्स आणि किंमतीची तुलना करणार आहोत जेणेकरुन तुम्हा तुमच्या पसंतीच्या फोनची निवड सहज करु शकाल.

डिस्प्ले

Realme 8i स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. दुसरीकडे, शाओमीच्या रेडमी 10 प्राइम स्मार्टफोनला 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळेल. त्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पंच-होल कॅमेरा दिला आहे.

प्रोसेसर

प्रोसेसर बद्दल सांगायचे झाल्यास कंपनी ने Realme 8i स्मार्टफोन मध्ये MediaTek चे Helio G96 प्रोसेसर दिले आहे. तर दुसरीकडे Redmi 10 Prime मध्ये Mediatek Helio G88 चिपसेट उपलब्ध असेल. या दोन्ही डिव्हाईसमध्ये अँड्रॉइड 11 आउट-ऑफ-द-बॉक्स सपोर्ट दिला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शन्ससह उपलब्ध आहेत.

हेही वाचा: सीएनजी पेक्षा बेस्ट मायलेज देतात 'या' इलेक्ट्रिक कार; पाहा डिटेल्स

कॅमेरा

Realme 8i स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्राइमरी सेन्सर 50MP आहे. तर 2MP चे दोन शुटर देण्यात आले आहेत. या फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. त्यासोबतच रेडमी 10 प्राइममध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 एमपी मुख्य लेन्स, 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर दिलेले आहे. या डिव्हाइसच्या समोरच्या बाजूला 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. पण या दोन्ही डिव्हाइसमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग फीचर देण्यात आलेले नाही.

बॅटरी लाइफ

Realme 8i स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी दिली असून ती बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ती बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी व्यतिरिक्त, दोन्ही हँडसेटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा: काय असेल iPhone 13 Pro Max ची किंमत आणि फीचर्स? पाहा डिटेल्स

किंमत किती आहे?

realme 8i

4GB + 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंम - 13,999 रुपये

6GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत - 15,499 रुपये

Redmi 10 Prime

4GB + 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत - 12,499 रुपये

6GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत - 14,499 रुपये

हेही वाचा: Realme 8i स्मार्टफोन भारतात लॉंच; पाहा किंमत आणि फीचर्स

loading image
go to top