
esakal
नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावर जीवसृष्टीच्या संभाव्य जैविक खुणा असलेले खडक नमुने शोधले.
आग्र्यात जन्मलेले भूवैज्ञानिक संजीव गुप्ता यांनी या शोधात मोलाची भूमिका बजावली.
मंगळ नमुना परत आणण्याची मोहीम लांबणीवर असली तरी भविष्यातील संशोधनासाठी आशा कायम आहे.
मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचे पुरावे सापडले असून यामुळे विश्वात आपण एकटे आहोत का या प्रश्नाचे उत्तर मिळण्याच्या दिशेने मानवजात एक पाऊल पुढे गेली आहे. नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने नुकतेच एका खडकाचे नमुने गोळा केले ज्यात सूक्ष्मजीवांच्या संभाव्य जैविक खुणा आढळल्या आहेत. या ऐतिहासिक शोधात आग्र्यात जन्मलेल्या भूवैज्ञानिक प्राध्यापक संजीव गुप्ता यांचा मोलाचा वाटा आहे. लंडनमधील इम्पीरियल कॉलेजच्या भूविज्ञान विभागात कार्यरत असलेल्या गुप्ता यांनी मंगळावरील जीवसृष्टीच्या शोधासाठी गेली दहा वर्षे आपले करिअर झोकून दिले आहे.