
एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस)मुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. जी कामे पूर्ण करण्यासाठी पूर्वी अनेक तास लागायचे तीआता क्षणार्धात पूर्ण होत आहेत. परंतु एआय देखील माणसांसाठी पर्याय म्हणून उदयास येत आहे. अनेक नोकऱ्यांमध्ये एआयने माणसांची जागा घेतली आहे. आता गुगलचे माजी कार्यकारी मो गावदत यांचे एक विधान आले आहे, ज्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. त्यांनी म्हटले आहे की येत्या १५ वर्षांत एआय माणसाला नरक दाखवेल, आणि २०२७ पासून वाईट टप्पा सुरू होईल.