Airtel Extreme : आता एअरटेलच्या ग्राहकांना पाहता येणार 'सन एनएक्सटी'चा कंटेंट; सहा भाषांमधील कित्येक चित्रपट अन् मालिका उपलब्ध

Sun TV Airtel Extreme Plus Tie up : ५ कोटी ग्राहकांना मिळणार ६ भाषांमधील मनोरंजनाचा खजिना ; भारतातील सर्वात मोठा ओटीटी कंटेंट पुरवणार
Airtel Extreme Plus Partenership with Sun NXT
Airtel Extreme Plus Partenership with Sun NXTesakal

Airtel Extreme Tie up: भारती एअरटेलच्या ओटीपी एकत्रित सेवा पुरवठादार 'एअरटेल एक्स्ट्रीम प्ले'ने सन टीव्ही नेटवर्क लि. च्या संचालित व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म 'सन एनएक्सटी'सह भागीदारी केली आहे. याद्वारे सनच्या सहा भाषांमधील मोठ्या कंटेंटचा वापर एअरटेल एक्स्ट्रीम च्या वापरकर्त्यांना करता येईल.

Airtel Extreme Plus Partenership with Sun NXT
Weekend Ott Release: वीकेंडला ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवणारे 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज नक्की बघा

एअरटेल एक्स्ट्रीम प्ले कडे पाच कोटीहून अधिक सशुल्क पेड सबस्क्राईबर आहेत. आता या सहकार्यामुळे त्यांना तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बांगला आणि मराठी अशा भाषांमधील चार हजारांहून जास्त चित्रपट, विशेष मालिका, टीव्ही शो, लाईव्ह टीव्ही, लहान मुलांसाठीचे साहित्य आदी सनचा पन्नास हजारांहून जास्त तासांचा खजिना मिळेल.

वापरकर्त्यांना एअरटेल एक्स्ट्रीम वरील २३ कंटेंट ॲप मधून हा कंटेंट मिळेल. त्यामुळे एअरटेल एक्स्ट्रीम हा भारतातील एकाच ॲपवरील ओटीपी कन्टेन्ट चा सर्वात मोठा पुरवठादार होईल. सोनी लाईव्ह, लायन्सगेट प्ले, चौपाल, होयकोई, फॅनकोड, मनोरमामॅक्स, ऑल्ट बालाजी, अल्ट्रा, ईरोस नाऊ, एपिकॉन, डॉक्युबे आणि प्लेफ्लिक्स हे एअरटेल एक्स्ट्रीम प्ले वरील इतर ॲप आहेत.

Airtel Extreme Plus Partenership with Sun NXT
Airtel Prepaid Plan : एअरटेलचा धमाका! IPL साठी लाँच केले तीन नवे प्लॅन्स; जाणून घ्या सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com