Airtel
Airtel sakal

Airtel : एअरटेलच्या निव्वळ नफ्यात ५४ टक्के वाढ ; ग्राहकांच्या संख्येतील वाढ आणि दरवाढीचा परिणाम

दूरसंचार कंपनी ‘भारती एअरटेल’ने डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक ५४ टक्क्यांनी झेप घेतली असून, २,४४२ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.

नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी ‘भारती एअरटेल’ने डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक ५४ टक्क्यांनी झेप घेतली असून, २,४४२ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. कंपनीने मागील वर्षीच्या याच कालावधीत १,५८८ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता, असे नियामकांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

मोठ्या किंमतीच्या योजनांवर भर देणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढल्यामुळे नफ्यात वाढ झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एअरटेल प्रीपेड मोबाईल ग्राहकांना सुमारे महिनाभर चालणाऱ्या सेवेसाठी आता किमान १५५ रुपये भरावे लागतात. कंपनीने जानेवारी २०२३ मध्ये याचे दर ५६ टक्क्यांनी वाढवले होते. भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल यांनी मोबाईल सेवा दरात आणखी वाढ करण्याची गरज असल्याचे सूतोवाच केले आहे.

Airtel
Airtel Satellite Internet : स्पेस एक्स अन् जिओला मात देणार एअरटेल? सॅटेलाईट इंटरनेटसाठी In-Space कडून मिळाली परवानगी

या तिमाहीत एअरटेलचा भारतातील महसूल वार्षिक ११.४ टक्क्यांनी वाढून २७,८११ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, कंपनीच्या एकूण महसुलावर नायजेरियन नायरा आणि मलेशियन चलन क्वाचाच्या अवमूल्यनामुळे परिणाम झाला आहे, असे गोपाल विठ्ठल यांनी म्हटले आहे. डिसेंबर तिमाहीत एअरटेलचा एकूण ग्राहक आधार वार्षिक आठ टक्क्यांनी वाढून ५५.१ कोटी झाला असून, भारतातील ग्राहक संख्या ७.५ टक्क्यांनी वाढून ३९.७ कोटी झाली आहे, तर आफ्रिकेतील ग्राहकांची संख्या ९.१ टक्क्यांनी वाढून १५.१७ कोटी झाली आहे.

प्रति वापरकर्ता सरासरी महसूल देशात ७.७ टक्क्यांनी वाढून २०८ रुपये झाला असून, एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत तो १९३ रुपये होता. देशात, एअरटेलच्या फोर-जी आणि फाइव्ह-जी ग्राहकांची संख्या वार्षिक आधारावर १३ टक्के व तिमाही आधारावर ३.१ टक्क्यांनी वाढून २४.४९ कोटी झाली असून, ती एकूण ग्राहकसंख्येच्या ७३.३ टक्के आहे. या तिमाहीत एकूण भांडवली खर्च ९,२७४ कोटी रुपये होता. त्यापैकी भारतातील खर्च ७,७५६ कोटी व आफ्रिकेतील खर्च १,५१५ कोटी रुपये होता.

कंपनीने निव्वळ कर्ज एका वर्षापूर्वीच्या २.०९ लाख कोटी रुपयांवरून २.०२ लाख कोटी रुपयांवर आणले आहे. कंपनीची एकूण कर्मचारी संख्या ४.१२ टक्क्यांनी वाढून १७,९२४ वर पोहोचली आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com