आता वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज! Airtel च्या 'या' प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचा फायदा | Mobile Recharge | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airtel

Mobile Recharge: आता वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज! Airtel च्या 'या' प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचा फायदा

Airtel-Jio Best Recharge Plans: देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या Airtel आणि Jio एकमेकांना टक्कर देण्यासाठी अनेक नवनवीन प्लॅन्स आणत असतात. यूजर्सला कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देण्याचा दोन्ही कंपन्यांचा प्रयत्न करत असतो. आता Airtel आपल्या स्वस्त प्लॅनद्वारे जिओला जोरदार टक्कर देत आहे. एअरटेल कमी किंमतीत येणाऱ्या आपल्या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची सुविधा देत आहे. कंपनीच्या या स्वस्त प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Social Media: बिनधास्त सोशल मीडिया वापरतायं? 'ही' चूक केल्यास भरावा लागेल ५० लाखांचा दंड

Airtel चा १७९९ प्रीपेड रिचार्ज प्लॅन

Airtel कडे अवघ्या १,७९९ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवस म्हणजेच संपूर्ण १ वर्षाची वैधता मिळते. यात तुम्हाला देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिले जाते. तसेच, एकूण २४ जीबी डेटा मिळेल. याशिवाय, वर्षभरासाठी एकूण ३६०० मोफत एसएमएस देखील दिला जातात.

Airtel चा हा प्लॅन अतिरिक्त बेनिफिट्ससह येतो. यामध्ये तुम्हाला ३ महिन्यांसाठी Apollo 24/7 Circle चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक मिळेल. तसेच, फ्री हॅलो ट्यून्स आणि Wynk Music चा देखील फायदा मिळेल.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Jio चा १,५५९ रुपयांचा प्लॅन-

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडे १,५५९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ३३६ दिवसांची वैधता मिळेल. जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण २४ जीबी डेटा, एकूण ३६०० एसएमएस दिले जातात. तसेच, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा देखील फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

हेही वाचा: Best Cars: तरुणांमध्ये 'या' गाड्यांची क्रेझ, स्पोर्टी लूक अन् शानदार फीचर्स; किंमत ८ लाखांपासून सुरू

टॅग्स :rechargemega recharge