तरुणांमध्ये 'या' गाड्यांची क्रेझ, स्पोर्टी लूक अन् शानदार फीचर्स; किंमत ८ लाखांपासून सुरू | Best Cars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Cars

Best Cars: तरुणांमध्ये 'या' गाड्यांची क्रेझ, स्पोर्टी लूक अन् शानदार फीचर्स; किंमत ८ लाखांपासून सुरू

Best Cars Under 10 Lakh in India: कमी किंमतीत हटके डिझाइनसह येणारी कार खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. खासकरून स्पोर्टी लूकसह येणारी कार खरेदी करण्याकडे तरुणांचा कल असतो. ह्युंडाई आणि टाटा सारख्या कंपन्यांनी १० लाख रुपयांच्या बजेटमध्ये स्पोर्टी लूकसह येणाऱ्या अनेक शानदार कार लाँच केल्या आहेत. दमदार इंजिन आणि स्पोर्टी लूकसह येणाऱ्या या कारविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Smart TV Offer: फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर! अवघ्या ७ हजारात खरेदी करा ३२ इंच स्मार्ट टीव्ही

Hyundai Grand i10 Nios Turbo

कमी बजेटमध्ये स्पोर्टी लूकसह येणारी कार शोधत असाल तर Hyundai Grand i10 Nios Turbo चांगला पर्याय आहे. या कारची सुरुवाती किंमत ८.०२ लाख रुपये आहे. यामध्ये ३ सिलेंडर १ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे १०० पीएस पॉवर आणि १७२ एनएम टॉर्क जरनेट करते. इंजिन ५ स्पीड गियर बॉक्ससह येते.

Tata Altroz iTurbo

टाटाच्या कारला शानदार सेफ्टी फीचर्ससाठी ओळखले जाते. Tata Altroz iTurbo ची सुरुवाती किंमत ८.२५ लाख रुपये आहे. यामध्ये टर्बो पेट्रोल १.२ लीटर इंजिन देण्यात आले असून, हे ११० पीएस पॉवर आणि १४० एनएम टॉर्क जनरेट करते. दमदार फीचर्ससह येणारी कार तरुणांमध्ये खास लोकप्रिय आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Hyundai i20 N Line

ह्यूंडाई आय२० मध्ये मोठे व्हीलबेस देण्यात आले आहेत. टॉप हॅचबॅक कार्सच्या लिस्टमध्ये i20 चा समावेश आहे. यामध्ये १ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे १२० पीएस पॉवर आणि १७२ एनएम टॉर्क जनरेट करते. स्पोर्टी लूक आणि शानदार इंटेरियरसह येणाऱ्या या कारची सुरुवाती किंमत १० लाख रुपये आहे.

हेही वाचा: Smartphone Tips: स्मार्टफोन ऐकतोय तुमच्या बेडरुममधील गप्पा? सेटिंगमध्ये त्वरित करा बदल, अन्यथा पडेल महागात

टॅग्स :carautoAutomobile