Airtel ची Xstream प्रीमियम सर्व्हिस लॉन्च, एकाच ॲपवर मिळणार 15 OTT

airtel launches xstream premium for 149 per month get 15 ott on single app know all details
airtel launches xstream premium for 149 per month get 15 ott on single app know all details

Airtel Xstream Premium : टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने गुरुवारी एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम ही नवीन व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस (Video Streaming Service) सुरू केली. यामध्ये, ग्राहकांना एकाच सबस्क्रिप्शनमध्ये 15 लोकप्रिय व्हिडिओ OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येणार आहे. या सर्व्हिसची किंमत ही दरमहा 149 रुपयांपासून सुरु होते. कंपनीला या पेड सर्व्हिसमधून तब्बल 2 कोटी नवीन वापरकर्ते मिळण्याची अपेक्षा आहे, असे एअरटेल डिजिटलचे सीईओ आदर्श नायर यांनी सांगितले.

मिळणार हे OTT अॅप्स

एअरटेल (Airtel) ने सांगितले की, या एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम सेवेमध्ये, ग्राहकांना एकाच अॅपमध्ये 15 भारतीय आणि जागतिक व्हिडिओ OTT चा आनंद घेता येईल. ज्यामध्ये ग्राहकांना 10,500 हून अधिक चित्रपटांचे कॅटलॉग तसेच SonyLIV, ErosNow, Lionsgate Play, Hoichoi, ManoramaMax, Shemaroo, Ultra, HungamaPlay, EPICon, Docubay, DivoTV, Klikk, Nammaflix, Dollywood, Shorts TV यांचा समावेश असेल

सेवा फक्त एअरटेल वापरकर्त्यांसाठी

कंपनीने सांगितले की Xstream Premium ही त्यांच्या आधिच्या कंटेट सर्व्हिसपेक्षा पूर्णपणे नवीन ऑफर आहे. वापरकर्ते मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉपवर अॅप किंवा वेबद्वारे आणि टीव्हीवरील Xstream सेट-टॉप-बॉक्सद्वारे ते ऍक्सेस करू शकतात. सध्या ते फक्त एअरटेल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

airtel launches xstream premium for 149 per month get 15 ott on single app know all details
घरात वाय-फाय आहे, मग हे रिचार्ज प्लॅन वाचवतील तुमचे भरपूर पैसे

Airtel Xstream Premium प्रत्येक वापरकर्त्यासाठी सिंगल अॅप, सिंगल सबस्क्रिप्शन, सिंगल साइन-इन, युनिफाइड कंटेंट सर्च आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस पॉवर्ड पर्सनलाइझ क्युरेशन (personalised curation) ऑफर करेल.एअरटेल वापरकर्त्यांना या सर्व सुविधांचा लाभ दर महिन्याला केवळ 149 रुपयांमध्ये मिळणार आहे.

दरम्यान, Media Partners Asia च्या मते, 2025 पर्यंत, भारताचे OTT (ओव्हर-द-टॉप) सबस्क्रिप्शन मार्केट सध्याच्या US$ 500 दशलक्ष वरून US$ 2 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन सब्सक्रिप्शन मोठा वाटा लहान शहरे आणि गावांमधील वापरकर्त्यांकडून येण्याची अपेक्षा आहे.

airtel launches xstream premium for 149 per month get 15 ott on single app know all details
उभ्या गाड्यांनाही आगीचा धोका! Hyundai, Kia ने लाखो कार मागवल्या परत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com