airtel
airtelsakal

5G स्पर्धेत AirTel ची उडी, ऑगस्टच्या शेवटी सुरू करणार सर्व्हिस

जिओ पाठोपाठ आता एअरटेल ने देखील आपल्या 5जी सर्व्हिस युजर्ससाठी आणण्याचं ठरवलं
Published on

भारतामध्ये 5जीचं जाळ वेगाने पसरणे सुरू झालंय. जिओ (JIO) ने 15 ऑगस्ट पासून 5जी सर्व्हिस लॉन्च करणार असल्याचं बोललं जाते तर आता यात एक नवीन नाव समोर आलंय. जिओ पाठोपाठ आता एअरटेल ने देखील आपल्या 5जी सर्व्हिस युजर्ससाठी आणण्याचं ठरवलं. (Airtel likely to launch 5G services in India by August end read details)

airtel
सॅमसंगचा आणखी एक 5G फोन लॉंच; मिळेल पावरफुल बॅटरी-कॅमेरा

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस एअरटेल 5 जी नेटवर्क सर्व्हिस सुरू करू शकते. Ericsson, Nokia आणि Samsung सोबत एअरटेलने अॅग्रिमेंट केलाय. सोबतच आता जिओला 5 जी नेटवर्क सुरू करणे गरजेचे आहे. कारण जिओने जर 5 जी नेटवर्क सुरू केले नाही आणि ऑगस्ट अखेरीस एअरटेल ने 5 जी नेटवर्क सुरू केले तर याचा मोठा फटका जिओला बसू शकतो.

airtel
5G सेवा कधी सुरू होणार? रेडिएशनचा धोका किती? केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर

नुकताच भारतातील 5जी लिलाव संपला. ऑगस्ट महिना अखेरिस 5 जी सेवा सुरू करण्यासाठी एअरटेल सज्ज असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. नुकत्याच झालेल्या लिलावात एअरटेलने 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 3300 MHz आणि 26 GHz फ्रीक्वेंसी मध्ये 19867.8 MHZ मिळवला आहे. त्यामुळे एअरटेलचं 5 जी नेटवर्क सुरू करणे हे कंपनीसाठी नफ्याचे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com