Samsung Galaxy A23 | सॅमसंगचा आणखी एक 5G फोन लॉंच; मिळेल पावरफुल बॅटरी-कॅमेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सॅमसंगचा आणखी एक 5G फोन लॉंच; मिळेल पावरफुल बॅटरी-कॅमेरा

सॅमसंगचा आणखी एक 5G फोन लॉंच; मिळेल पावरफुल बॅटरी-कॅमेरा

Samsung ने आज त्यांचा Samsung Galaxy A23 5G हा लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. काही स्पेसिफिकेशन्स आणि इमेजेससह हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला Galaxy A23 5G मध्ये फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Android 12 वर आधारित One UI 4.1 वर चालतो. मात्र, सॅमसंगने प्रोसेसरबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनीने सरळ सांगितले की फोन ऑक्टा-कोर चिपने सुसज्ज आहे. याशिवाय, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.1 आणि ड्युअल-बँड वाय-फाय सपोर्ट दिला आहे.

Samsung Galaxy A23 5G ची किंमत

सध्या कंपनीने Samsung Galaxy A23 5G ची किंमत आणि उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याची किंमत गेल्या वर्षी आलेल्या A22 5G च्या आसपास असू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरं तर, Galaxy A22 5G भारतात गेल्या वर्षी जुलैमध्ये 6GB RAM + 128GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटसाठी 19,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. तर त्याच्या 8GB RAM + 128GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये होती. म्हणून आपण Samsung कडून नवीन Galaxy A23 5G ची किंमत समान ठेवण्याची अपेक्षा करू शकतो.

सॅमसंगने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, Galaxy A23 5G गुलाबी, निळा, पांढरा आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये दिसत आहे. कंपनीने अद्याप यापैकी कोणत्याही कलप ऑप्शन्ससाठी कोणतेही नाव जाहीर केलेले नाही. सॅमसंगने Galaxy A23 5G लाँच केलेल्या देशांची नावे देखील उघड केलेली नाहीत.

Samsung Galaxy A23 5G चे फीचर्स

Samsung Galaxy A23 5G Android 12 वर आधारित One UI 4.1 वर चालतो. तसेच यात फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये 4GB, 6GB आणि 8GB रॅम पर्याय आहेत. यात 64GB आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज पर्याय देखील मिळतात. स्टोरेज मायक्रोएसडी द्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. सॅमसंगने चिपसेटचे नाव अद्याप उघड केलेले नसले तरी, कंपनीने फक्त हे उघड केले आहे की Galaxy A23 5G ऑक्टा-कोर चिपसह सुसज्ज असेल.

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy A23 5G एक क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि दुसरा 2-मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. प्रायमरी कॅमेराला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्ट देखील मिळतो. समोर, हँडसेटमध्ये f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. कंपनीने सांगितले की, कॅमेरा सेन्सरची उपलब्धता बाजारपेठेनुसार बदलू शकते.

स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ v5.1 सपोर्ट दिला आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर, गायरो सेन्सर, एक्सीलरोमीटर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, ग्रिप सेन्सर, व्हर्च्युअल लाइटिंग सेन्सर आणि वर्च्युअल प्रॉक्सिमिटी सेन्सर मिळतो. या स्मार्टफोनचे डायमेंशन्स 165.4 x 76.9 x 8.4 मिमी आणि वजन सुमारे 197 ग्रॅम आहे.

टॅग्स :Samsung