Airtel Tariff Plan Rate : एअरटेलच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी! टॅरिफ प्लान्सच्या किंमती वाढणार; सुनिल मित्तल म्हणाले...

Airtel Recharge Hike : मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या माहितीनुसार, यावर्षी जूनच्या नंतर कंपनीचे टॅरिफ प्लान्स महाग होऊ शकतात.
Airtel Tariff Plan Rate
Airtel Tariff Plan RateeSakal

Airtel to Hike Tariff Rates : देशातील अग्रगण्य टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये एअरटेलचं नाव समोर येत. देशात कोट्यवधी लोक एअरटेलचं सिमकार्ड वापरतात. या सर्व ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच एअरटेल आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ करणार आहे. कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी स्वतःच याबाबतचे संकेत दिदले आहेत. (Tech News)

सुनिल मित्तल यांनी सांगितलं, की मार्केटला मजबूत ठेवण्यासाठी कंपनी भारतात टेलिकॉम रेट्स वाढवणार आहे. रिचार्जचे नवीन दर कधीपासून लागू होतील याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या माहितीनुसार, यावर्षी जूनच्या नंतर कंपनीचे टॅरिफ प्लान्स महाग होऊ शकतात. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रेव्हेन्यू वाढीसाठी निर्णय

एअरटेल कंपनीचा सध्याचा प्रति यूजर सरासरी रेव्हेन्यू (ARPU) हा 208 रुपये आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हा रेव्हेन्यू 300 रुपये करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. एअरटेलने भारतात 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी सुमारे 40,000 रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. आता तो खर्च भरुन काढण्यासाठी कंपनी रिचार्ज दर वाढवू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Airtel Tariff Plan Rate
Elon Musk Sues Sam Altman : चॅटजीपीटी बनवणाऱ्या 'Open AI' कंपनीला इलॉन मस्कने खेचलं कोर्टात; सॅम अल्टमनसोबत कशामुळे वाजलं?

जिओ-व्हीदेखील वाढवणार किंमती?

यापूर्वी 2021 साली एअरटेलने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्सच्या किंमतींमध्ये 20 टक्के वाढ केली होती. त्यावेळी पुढच्याच महिन्यात जिओ आणि व्ही (वोडाफोन-आयडिया) या कंपन्यांनी देखील आपल्या टॅरिफ प्लानच्या किंमती वाढवल्या होत्या. यामुळे आता पुन्हा एकदा एअरटेल पाठोपाठ या दोन कंपन्या देखील आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com