Airtel Free OTT Plan : एअरटेलचे सर्वात स्वस्त प्लॅन्स; 1 वर्षासाठी फ्री मिळतं हॉटस्टार अन् प्राइम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

airtel postpaid plans that offer disney plus hotstar amazon prime check price

Airtel Free OTT Plan : एअरटेलचे सर्वात स्वस्त प्लॅन्स; 1 वर्षासाठी फ्री मिळतं हॉटस्टार अन् प्राइम

Airtel Postpaid Plans Free OTT Plan Offers : भारती एअरटेल देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्स जिओ प्रमाणे, एअरटेल देखील त्याच्या पोस्टपेड ग्राहकांना Disney+ Hotstar आणि Amazon Prime सारख्या लोकप्रिय OTT चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करते.

एअरटेलचे असे एकूण 4 प्लॅन आहेत ज्यात मोफत हॉटस्टार आणि प्राइम मेंबरशिप उपलब्ध आहे. एअरटेलच्या या प्लॅन्सची किंमत 499 रुपयांपासून सुरू होते. तुम्हालाही ऑनलाइन कंटेंट पाहण्याची आवड असेल आणि तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यायचे नसतील, तर तुम्ही हे प्लॅन घेऊ शकता. 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या पोस्टपेड प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घ्या...

हेही वाचा: Shubhman Gill : ' शुभमनला जो आऊट करेल त्याला १०० रुपये बक्षीस'; वडिलांची ती पैजे अन्…

Airtel’s Free Disney+ Hotstar, Amazon Prime Plans

एअरटेलचे चार प्लॅन मोफत OTT ऑफर करत आहेत, ज्यांची किंमत रु 499, रु 999, रु 1,199 आणि रु 1,499 आहे. आज आपण 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या पोस्टपेड प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

Airtel चा 499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

भारती एअरटेलच्या 499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस दररोज उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये 75 GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, ग्राहकांना 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप आणि 1 वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत मिळते.

याशिवाय एअरटेलच्या या प्लॅनमध्ये हँडसेट प्रोटेक्शन आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अॅड ऑन फॅमिली कनेक्‍शन देखील ऑफर केले जातात. ग्राहक 299 रुपये प्रति महिना नियमित कनेक्शन घेऊ शकतात.

हेही वाचा: Shyam Manav : धिरेंद्र महराजांना आव्हान देणाऱ्या शाम मानव यांच्या कार्यक्रमात राडा!

Airtel चा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

एअरटेलच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100GB मासिक डेटा यासारखे फायदे आहेत. या प्लॅनमध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तीन अतिरिक्त नियमित व्हॉइस कनेक्शन उपलब्ध आहेत. प्रत्येक कनेक्शनसाठी 30GB डेटा ऑफर केला जातो. याशिवाय 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप, 1 वर्षासाठी Disney + Hotstar सबस्क्रिप्शन यांसारख्या सुविधाही प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. एअरटेलचा हा प्लॅन हँडसेट संरक्षण आणि मोफत विंक प्रीमियम सबस्क्रिप्शनसह येतो.

टॅग्स :Airtel