Photo App : कमालीचं ॲप! आठवणी होतील ताज्या, या ॲपने आजोबा पणजोबांचा ब्लर फोटो झटक्यात क्लिअर करा

कालांतराने छायाचित्रे जुनी होतात आणि खराब होऊ लागतात
Photo App
Photo Appesakal

Photo App : फोटोच्या रुपात आपण आपल्या बालपणीपासूनच्या आठवणी जमा करून ठेवतो. मात्र कालांतराने छायाचित्रे जुनी होतात आणि खराब होऊ लागतात, जुन्या काळी डिजिटल कॅमेरे नव्हते, अशा परिस्थितीत लोक छायाचित्रे फक्त भौतिक स्वरूपातच ठेवत असत पण काही वेळाने त्याची क्लॅरीटी खराब होऊ लागते. असे फोटो तुमच्याकडेही असतील तर चिंता करायची गरज नाही.

ही जुनी छायाचित्रे डिजिटल पद्धतीने रिस्टोअर करता येत असली तरी त्यातही गुणवत्तेत फारसा फरक नाही. सध्या तुम्ही चांगल्या कॅमेर्‍याने फोटो क्लिक करता तेव्हा त्याची क्वालिटी जबरदस्त असते. आजच्या 4K फोटोप्रमाणे तुम्हाला तुमच्या आजी-आजोबांच्या काळातील फोटो बनवायचा असेल, तर आता यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही स्वत: तो बदलू शकता.

या वेबसाइटच्या मदतीने जुनी छायाचित्रे 4K सारखी दिसतील

त्यासाठी तुम्हाला sczhou/codeformer हे नाव गुगलवर सर्च करावे लागेल. यानंतर तुम्हाला त्याच नावाची लिंक दिसेल. आता एक वेबसाइट उघडेल. आता तुम्हाला ते छायाचित्र या वेबसाइटवर अपलोड करावे लागेल जे तुम्हाला 4k गुणवत्तेत बदलायचे आहे. यानंतर, तुम्हाला फक्त ते सबमिट करावे लागेल आणि हे केल्यानंतर, काही सेकंदांच्या प्रक्रियेनंतर, एक उत्कृष्ट छायाचित्र तुमच्यासमोर उघडेल, जे तुम्ही सहजपणे डाउनलोड करून वापरू शकता.

Photo App
OTT App: Netflix-Hotstar साठी पैसे खर्च करण्याची गरजच नाही, 'या' अ‍ॅपवर मोफत पाहू शकता चित्रपट-सीरिज

या प्रक्रियेला फक्त काही सेकंद लागतात आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा आवडता फोटो 4K गुणवत्तेत मिळेल. जर तुम्हाला या प्रक्रियेची कल्पना नसेल, तर आता या वेबसाइटच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोवर घरबसल्या अगदी खराब छायाचित्रे सहज क्लिअर करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com