रेडमी फोन स्वस्तात खरेदीची संधी, मिळतोय बंपर डिस्काउंट; एकदा पाहाच | Best Offers On Redmi Smartphones | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

discount offers on redmi smartphones

रेडमी फोन स्वस्तात खरेदीची संधी, मिळतोय बंपर डिस्काउंट; एकदा पाहाच

discount offers on redmi smartphones : जर तुम्ही स्वस्त फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला कमी किंमतीत चांगला फोन घ्यायचा असेल तर आज आपण काही बेस्ट ऑफर्सची माहिती जाणून घेणार ​​आहोत. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर यूजर्सना Redmi स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला जात आहे. सर्व डिस्काउंटनंतर फोन सुमारे 2,000 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. आज आपण Redmi फोनवर मिळणाऱ्या टॉप 3 ऑफर्सबद्दल माहिती घेऊयात. हे सर्व स्मार्टफोन ऑप्शन्स 6GB RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह येतात.

Redmi Note 10S : या फोनच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे आणि हा फोन 2,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह 14,999 रुपयां मध्ये खरेदी केले जाऊ शकतो. जर तुम्हाला पूर्ण पैसे भरून तो विकत घ्यायचा नसेल, तर तुम्ही EMI वरही फोन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला दरमहा किमान 706 रुपये भरावे लागतील. 13,200 रुपयांपर्यंतच्या सात एक्सचेंज ऑफरही दिल्या जात आहेत. तुम्ही पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास तुम्हाला हा फोन फक्त 1,799 रुपयां मध्ये मिळेल.

Redmi Note 11T 5G : हा फोन 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह अगदी कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन 18,999 रुपयांऐवजी 2,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते दरमहा 800 रुपयांच्या किमान EMI सह देखील खरेदी करू शकता. यासोबत 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर यूजर्स हा फोन फक्त 2,099 रुपयांना खरेदी करू शकतात.

हेही वाचा: Jio Vs Airtel Vs VI : हे आहेत 84 दिवसांचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Redmi Note 10 Pro : या फोनबद्दल बोलायचे झाले तर याचे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट अतिशय कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात. हा फोन 19,999 रुपयांऐवजी 17,999 रुपयांना विकत घेता येईल. यावर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्ही 847 रुपये प्रति महिना भरून देखील ते खरेदी करू शकता. याशिवाय 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही यावर मिळत आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, वापरकर्ते हा फोन फक्त 3,099 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

हेही वाचा: 30 दिवस वैधता असलेला एकतरी रिचार्ज प्लॅन हवा; TRAI चे निर्देश

Web Title: Amazon Discount Offers On Redmi Smartphones Big Discount On Redmi Note 10s Note 11t And Note 10 Pro Check Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologyAmazon
go to top