Online Shopping : ...म्हणून Amazon-Flipkart वर स्वतात मिळतात अनेक गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Shopping

Online Shopping : ...म्हणून Amazon-Flipkart वर स्वतात मिळतात अनेक गोष्टी

Online Shopping : नुकतीच दिवाळी संपली असेल, अनेकांनी या काळात भरपूर प्रमाणात ऑनलाईन खरेदी केली असेल, यावेळी अनेकांना तगडा डिस्काउंटही मिळाला असेल. मात्र, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एवढा मोठा डिस्काउंट कसा काय दिला जातो असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा: Technology ; iPhone 14 Discount : भन्नाट ऑफर ! आयफोनवर मिळवा बंपर डिस्काउंट

कमी किमतीत विकता येतील अशा वस्तू या कंपन्या कुठून आणतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच स्वतात एखादी वस्तू विकून त्यातून नफा कसा मिळतो असा प्रश्नदेखील पडतो. आज आपण या संपूर्ण प्रक्रियेची व्यावसायिक संकल्पना काय आहे ते जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Flipkart Sale : मोटोरोलाच्या स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, येथे पाहा यादी

MSMEs ला बढावा देऊन Amazon आणि Flipkart स्वतात वस्तू विकतात. MSMEs म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग होय. दोन्ही ई-कॉमर्स कंपन्या स्वस्तात वस्तू विकण्यासाठी स्थानिक व्यवसायीक आणि इतर एमएसएमईंशी संपर्क साधतात.

हेही वाचा: स्वस्तात खरेदी करा 43-इंचाचा Smart TV; फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतेय बंपर ऑफर

म्हणून स्वतात वस्तू विकतात कंपन्या

कोणत्याही कंपनीच्या वेबसाइटवर पाहिल्यास तेथील उत्पादनाची किंमत Amazon-Flipkart पेक्षा जास्त आहे. मग प्रश्न येतो की, मग या कंपन्या का वस्तू स्वस्तात विकतात? याचे कारण अधिक माल विकून अधिक नफा मिळवणे हे आहे.

याशिवाय स्वतात वस्तू विकल्याने अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ग्राहकांचा एक मोठा गट मिळतो. डिस्काउंट दिल्याने एखाद्या उत्पादनावर कमी नफा मिळू शकतो. मात्र, असे केल्याने वस्तू अधिक प्रमाणात खरेदी केल्यामुळे कंपनीच्या एकूण नफ्यात मोठी वाढ होते.

हेही वाचा: Samsung Offer : सॅमसंगचा 5G फोल्डेबल फोन ८१ हजारांनी स्वस्त; ऑफर काहीच तास

बँक ऑफरचे फायदे

ई-कॉमर्सवरील प्रत्येक उत्पादनावर जवळपास सर्वच बँकांकडून त्यांच्या कार्डवर सूट दिली जाते. याचा फायदा कंपन्यांनाही मिळतो. सेलवर दाखवण्यात आलेली किंमत ही सर्व सवलतींसह दाखवण्यात आलेली असते. यामध्ये बँक ऑफर्सचाही समावेश असतो. त्यामुळे कंपन्यांना त्यांचा माल स्वस्तात विकता येतो.