Samsung Offer : सॅमसंगचा 5G फोल्डेबल फोन ८१ हजारांनी स्वस्त; ऑफर काहीच तास

Samsung Galaxy Z Fold 3 5G ची MRP 1,71,999 रुपये आहे.
Samsung Galaxy Z Fold 3 5G
Samsung Galaxy Z Fold 3 5G Sakal

Samsung Offer : सिंगल स्क्रीन स्मार्टफोन वापरण्याचा कंटाळा आला आहे? जर तुमचं उत्तर हो असेल तर, तुम्ही सॅमसंगचा ५ फोल्डेबल फोन घेऊन शकता. विशेष म्हणजे हा फोन ग्राहकांना ८१ हजार रुपयांनी स्वस्त खरेदी करण्याची संधी आहे.

Samsung Galaxy Z Fold 3 5G
Oppo Diwali Offer : स्मार्टफोनवर 10 लाख जिंकण्याची संधी, स्मार्ट प्रॉडक्टवर 3500 हजारांची सूट
Samsung galaxy M33
Samsung galaxy M33

सॅमसंगचा पॉवरफुल फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Fold 3 5G सध्या बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. Amazon वर या फोनवर 30 टक्के सवलत दिली जात आहे. एवढेच नव्हे तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑफर केलेल्या एक्सचेंज आणि बँकिंग ऑफरचा फायदा तुम्हाला घेता येणार आहे.

Amazon वर सध्या ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेल सुरू आहे, ज्या अंतर्गत या प्रीमियम फोनवर मोठी सूट दिली जात आहे. ही ऑफर उद्या संपणार असून, तुम्हीदेखील कमी किमतीत हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्याकडे काहीच तासांचा अवधी शिल्लक आहे.

Samsung Galaxy Z Fold 3 5G
Diwali offer : अवघ्या १७ मिनिटांत पूर्ण चार्ज होणारा 5G फोन सवलतीत उपलब्ध
tech company offer
tech company offer

ऑफर नेमकी काय?

Samsung Galaxy Z Fold 3 5G ची MRP 1,71,999 रुपये आहे, पण सेल दरम्यान यावर 30 टक्के डिस्काउंटसह देण्यात येत आहे. त्यामुळे हा फोन फक्त 1,19,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याचाच अर्थ या फोनवर तब्बल ८१,000 हजारांची सुट देण्यात येत आहे. ही ऑफर12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे.

Samsung Galaxy Z Fold 3 5G
Festive Offer : ही क्रेडीट कार्ड कंपनी देत आहे २२.५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक

अशी आहे एक्सचेंज आणि बँक ऑफर

डिस्काउंटसोबतच तुम्ही हा फोन एक्सजेंच आणि बँकेच्या कार्डवरील ऑफरवरही हा फोन खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे एक्सचेंजसाठी जुना स्मार्टफोन असेल आणि तो चांगल्या स्थितीत असेल, तर तुम्हाला Samsung Galaxy Z Fold 3 5G वर 14,050 पर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. एक्सचेंजची ही रक्कम तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि मॉडेल यावर अवलंबून असेल. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुमच्या राज्याचा पिन टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या राज्यात कोणती ऑफर दिली जात आहे याचे तपशील दिसून येतील.

Samsung Galaxy Z Fold 3 5G
Apple TV 4K : सामान्यांना परवडणारा Apple चा TV भारतात लॉन्च; फिचर्स आहे स्मार्ट

Amazon Samsung Galaxy Z Fold 3 5G वर एकूण 23 बँकांनी ऑफर दिली आहे. यामध्ये ICICI बँक क्रेडिट कार्ड, सिटी बँक क्रेडिट कार्ड आणि कोटक क्रेडिट कार्ड वापरून 4,000-5,000 रुपयांपर्यंत बंपर सूट मिळवू शकता. याशिवाय, 60,000 रुपयांच्या किमान खरेदी मूल्यासह सर्व बँकांच्या कार्ड व्यवहारांवर अतिरिक्त 10,000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे.

बँकांच्या या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही या फोनवर सुमारे 14 ते 15 हजारांची बचत करू शकता. थोडक्यात सांगायचे तर, तुम्ही Samsung Galaxy Z Fold 3 5G Rs 91,000 (1,19,999- 14,000-15,000) मध्ये खरेदी करू शकता, जो MRP पेक्षा जवळपास 81 हजारांनी कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com