Amazon Sale : गेमिंग लॅपटॉप, कन्सोल अन् ॲक्सेसरीजवर मिळतेय बंपर सूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon grand gaming days sale check offers on laptop console graphics-card accessories and  tv monitors

Amazon Sale : गेमिंग लॅपटॉप, कन्सोल अन् ॲक्सेसरीजवर मिळतेय बंपर सूट

Amazon Grand Gaming Days Sale : ॲमेझॉन ग्रँड गेमिंग डेज सेल सेल सध्या भारतात लाइव्ह झाला असून, या सेलमध्ये गेमिंग गॅझेट्सवर अनेक डिल आणि ऑफर दिल्या जात आहेत. ग्राहक गेमिंग लॅपटॉप, डेस्कटॉप, मॉनिटर्स, गेमिंग कन्सोल, ग्राफिक्स कार्ड, टीव्ही आणि बरेच काही वर डील्सचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

या सेलमध्ये Acer, Sony, HP, Dell, JBL, Corsair आणि Cosmic Byte सारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या गेमिंग प्रॉडक्ट्सवर ऑफर उपलब्ध आहेत. ग्राहकांना या उत्पादनांवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. इतकेच नाही तर एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत. Amazon चा Grand Gaming Days सेल हा 30 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे. ग्राहकांना गेमिंगच्या चांगल्या एक्सपिरिएंससाठी चांगली RAM आणि हाय रिफ्रेश रेट असलेल्या मोठ्या टीव्ही स्क्रीनवर 40 टक्के सूट देखील मिळू शकते .

गेमिंग TV वर मिळताय ऑफर्स

Sony Bravia 55X80AJ हा 55-इंचाचा स्मार्ट टीव्ही आहे जो Google TV ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात 4K HDR तंत्रज्ञानाचा समावेश आहे, ज्यामुळे गेमिंगचा एक्सपिरिएंस कितीतरी पटीने सुधारता येईल. हा टीव्ही सध्या 74,990 रुपयांना उपलब्ध आहे. ज्याची मूळ किंमत 1,09,900 रुपये आहे. याव्यतिरिक्त, Redmi X55 हा आणखी एक उत्तम गेमिंग टीव्ही आहे जो सध्या 44,999. च्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.

हेही वाचा: WhatsApp ग्रुप ॲडमिनची पावर वाढणार; येतंय नवीन फीचर, वाचा डिटेल्स

गेमिंग लॅपटॉपवर ऑफर्स

तुम्ही गेमिंग लॅपटॉप शोधत असाल तर तुमच्यासाठी भरपूर पर्याय या सेलमध्ये देण्यात आले आहेत. HP Pavilion Gaming , Acer Nitro 5 , Lenovo Ideapad Gaming 3 , आणि HP Victus गेमिंग लॅपटॉपवर चांगल्या ऑफर मिळत आहेत . Asus ROG Zephyrus G14 हा लॅपटॉप या सेलमध्ये 1,39,990 रुपयांना उपलब्ध आहे.

गेमिंग ॲक्सेसरीजवर डील्स

तुम्ही तुमचा गेमिंग सेटअप तयार करण्याचा विचार करत असाल, तर सध्या गेमिंग अॅक्सेसरीजवर उत्तम ऑफर उपलब्ध आहेत. Asus GT-AX11000 ROG रॅप्चर राउटर सध्या 32,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे ज्याची किंमत 48,500 रुपये आहे. Logitech G502 गेमिंग माउस वर देखील सध्या 41 टक्के सूट मिळत आहे.

हेही वाचा: Honda च्या 'या' 125cc स्कूटरला मिळतेय पसंती; झाली 2 लाखांहून जास्त खरेदी

Web Title: Amazon Grand Gaming Days Sale Check Offers On Laptop Console Graphics Card Accessories And Tv Monitors

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top