Honda च्या 'या' 125cc स्कूटरला मिळतेय पसंती; झाली 2 लाखांहून जास्त खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grazia 125

Honda च्या 'या' 125cc स्कूटरला मिळतेय पसंती; झाली 2 लाखांहून जास्त खरेदी

दुचाकी कंपनी होंडाच्या Grazia 125 स्कूटरला बाजारात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, कंपनीने सांगितले की या स्टायलिश दिसणाऱ्या स्कूटरने देशात 2 लाख युनिट विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. या स्कूटरमध्ये एक्सटर्नल फ्यूल लिड आणि इंजिन कट ऑफ सोबत साइड स्टँड इंडिकेटर सारखे फीचर्स दिले आहेत या स्कुटरची थेट स्पर्धा ही TVS NTorq 125, Suzuki Burgman Street आणि Aprilia SR 125 सारख्या स्कूटरशी होणार आहे.

कंपनीने म्हटले आहे की, या स्कूटरला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, ज्यामुळे देशाच्या पूर्वेकडील भागात हा मोठा टप्पा पार केला आहे. या भागातील बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, ओडिशा, आसाम आणि नागालँड या राज्यांचा समावेश होतो. स्कूटर एकूण तीन व्हेरिएंटमध्ये येते. त्याची किंमत 78,389 रुपये ते 87,668 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Honda Grazia BS6 हे स्कूटर लूक आणि फीचर्सच्या बाबतीत बेस्ट असून यात एलईडी हेडलॅम्पसह अगदी नवीन स्पोर्टियर बॉडीवर्क मिळते. हँडलबार काउलला एलईडी डीआरएल आणि 'जेट-इंस्पायर्ड' टेल लॅम्प मिळतात. स्कूटरला पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे ज्यामध्ये टॅकोमीटर रीडिंग , डिस्टंस-टू-एम्टी, रिअलटाईम आणि सरासरी मायलेज दाखवले जाते. यात एक्सटर्नल फ्युएल फिलर आणि सायलेंट स्टार्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत.

हेही वाचा: रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

पावरफुल इंजिन

Honda Grazia 125 ला कंपनीच्या Activa 125 प्रमाणे 124cc सिंगल-सिलेंडर इंधन-इंजेक्टेड इंजिन मिळते. हे इंजिन 8.25PS पावर आणि 10.30Nm टॉर्क जनरेट करते. Activa 125 मध्ये, ही मोटर Grazia 125 प्रमाणेच टॉर्क बनवते, परंतु पीक पॉवर किंचित जास्त आहे. ग्रेझिया 125 ला सायलेंट स्टार्ट आणि आयडलिंग स्टॉप सिस्टमसाठी ACG स्टार्टर मोटर देखील मिळते.

हेही वाचा: रेडमी फोन स्वस्तात खरेदीची संधी, मिळतोय बंपर डिस्काउंट; एकदा पाहाच

Web Title: More Than 2 Lakhs Honda Grazia 125cc Scooter Sold In India Check Powerful Features With Stylish Look

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobile