Amazon Sale | प्राइम मेंबर्ससाठी फ्रीडम फेस्टीव्हल सेल सुरू, जाणून घ्या ऑफर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon great freedom festival 2022 sale live for prime members check offers and details

Amazon Sale | प्राइम मेंबर्ससाठी फ्रीडम फेस्टीव्हल सेल सुरू, जाणून घ्या ऑफर्स

Amazon Great Freedom Festival 2022 sale : जर तुमची Amazon प्राइम डे सेल मध्ये खरेदी करायची राहून गेली असेल तर काळजी करू नका. कारण Amazon तुम्हाला आणखी एक संधी देत ​​आहे. Amazon आता ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2022 चे आयोजन करत आहे, जे आधीच प्राइम मेंबर्ससाठी लाइव्ह झाला आहे. नॉन-प्राइम सदस्यांसाठी, हा सेल 6 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 10 ऑगस्टपर्यंत चालेल. अॅमेझॉनवरील या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, अप्लायन्सेस, टीव्हीवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

या सेलमध्ये फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, वापरकर्ते निवडक बँक कार्डांवर मर्यादित बँक डिस्काउंट देखील मिळवू शकतील. ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट EMI वर अतिरिक्त 10 टक्के इंस्टट सूट मिळू शकते.

याशिवाय, तुम्ही बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड, अॅमेझॉन पे, आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड, अॅमेझॉन पे लेटर, नो-कॉस्ट ईएमआय आणि डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून डिस्काउंट मिळवू शकता.

हेही वाचा: Amazon sale : स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा डिटेल्स

डिस्काउंट कशावर मिळेल?

या सेलमध्ये iPhone 13 स्मार्टफोन 68,900 रुपयांना विकत घेऊ शकता. तुम्हाला या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला 15000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तथापि, हे पूर्णपणे तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि फोनच्या ब्रँडवर अवलंबून असते.

तुम्हाला OnePlus 9 Series 5G वर 15,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, जी 37,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. यावर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर आणि SBI बँक ऑफर देखील मिळेल.

दुसरीकडे, OnePlus 10R बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला या फोनवर 4000 रुपयांची सवलत मिळू शकते आणि 6 महिन्यांसाठी ईएमआय, एक्सचेंज आणि बँक ऑफरवर 3000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

या सेलमध्ये OnePlus 10 Pro 5G नेव्हर बिफोर ऑफरसह 5000 रुपयांच्या प्लॅट डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर, तुम्हाला SBI बँक कार्डसह रु. 6000 ची सूट, 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंजवर अतिरिक्त रु. 5000 ची सूट मिळते.

हेही वाचा: 5G सेवा कधी सुरू होणार? रेडिएशनचा धोका किती? केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर

Web Title: Amazon Great Freedom Festival 2022 Sale Live For Prime Members Check Offers And Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amazon