Amazon Festival Sale: चांगल्या डील्स हव्या आहेत? मग या गोष्टी जाणून घ्या आणि स्वस्तात मस्त प्रोडक्ट्स मिळवा!

या सेलमध्ये मोठमोठ्या सवलती आहेत, पण काही गोष्टी माहित नसल्याने अनेकांना या सेलचा लाभ घेता येत नाही.
Amazon Great Indian Festival Sale
Amazon Great Indian Festival SaleSakal

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे, परंतु त्यापूर्वी हा सेल प्राइम सदस्यांसाठी कालपासून म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून सुरू झाला होता. The Great Indian Festival Sale हा Amazon चा वर्षातील सर्वात मोठा सेल आहे.

या Amazon सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, कपडे आणि इतर उत्पादनांवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत, पण प्रत्येकजण त्याचा लाभ घेऊ शकत नाही कारण त्यांना सेलचा फायदा कसा घ्यावा हे माहित नाही. आज आम्ही तुम्हाला या सेलमध्ये सर्वोत्तम डील कशी मिळवायची ते सांगणार आहोत.

Amazon Great Indian Festival Sale
Amazon Sale iPhone : सेल सुरू व्हायच्या आधीच संपला आयफोनचा स्टॉक? कित्येक लोकप्रिय मॉडेल झाले गायब

जेव्हा तुम्ही Amazon वरून खरेदी करता तेव्हा तुम्हाला काही कूपन मिळतात. या कूपनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे ते कूपन तुमच्या खात्यात राहतात. तुम्ही चांगल्या डीलसाठी Amazon कूपन वापरू शकता. कूपनद्वारे तुम्हाला ५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांसाठी वेगवेगळी कूपन्स उपलब्ध आहेत.

लाईटनिंग डील

विक्री सुरू झाल्यानंतर, एकदा निश्चितपणे लाइटनिंग डील तपासा. लाइटनिंग डील दररोज फक्त २-३ तास चालतात. या डील्सला Today's Deals म्हणूनही ओळखलं जातं.

Amazon Great Indian Festival Sale
Amazon Sale : अमेझॉनच्या 'ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल'ला सुरुवात; फ्रीज, वॉशिंग मशीन अन् एसीवर किती मिळतोय डिस्काउंट?

नोटिफिकेशन

चांगलं डील मिळविण्यासाठी Amazon अॅपचे नोटिफिकेशन सतत चालू ठेवा. कोणत्याही उत्पादनावर चांगली डील किंवा सूट मिळताच तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. अॅमेझॉन असिस्टंट तुम्हाला चांगली डील शोधण्यात मदत करू शकतो. पण ते सध्या डेस्कटॉपसाठी उपलब्ध आहे. ते तुम्हाला तुमच्या गरजेनुसार खरेदी करण्यात खूप मदत करेल.

पेमेंटचे पर्याय

फास्ट खरेदीसाठी, तुमचा पेमेंट मोड म्हणजेच UPI आयडी किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड Amazon वर सेव्ह करा. हे तुम्हाला फास्ट पेमेंट करण्यात मदत करेल आणि तुम्हाला वस्तूंचा स्टॉक संपण्यापूर्वी मिळण्याची जास्त शक्यता असेल. तुम्हाला Amazon Pay वर सूट मिळू शकते. त्यामुळे चांगल्या सवलतींसाठी Amazon Pay चा वापर करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com