Amazon Sale : नवीन वर्षात घ्यायच्यात नव्या वस्तू? येतोय अमेझॉनचा 'ग्रेट रिपब्लिक डे सेल'; कंपनीने केली मोठी घोषणा

Amazon Sale in January : अमेझॉनच्या वर्षभरातील मोठ्या सेलपैकी हा एक सेल असतो. कंपनी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या सेलचं आयोजन करते.
Amazon Sale in January
Amazon Sale in January eSakal

Amazon Republic Day Sale : तुम्ही जर नवीन वर्षात काही नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अमेझॉन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने आपल्या 'ग्रेट रिपब्लिक डे सेल'ची घोषणा केली आहे. नावात दिल्याप्रमाणेच, भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या सेलचं आयोजन करण्यात येणार आहे.

अमेझॉनच्या वर्षभरातील मोठ्या सेलपैकी हा एक सेल असतो. कंपनी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या सेलचं आयोजन करते. यावर्षीच्या सेलच्या तारखांबाबत (Amazon Sale Dates) अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, कंपनीच्या वेबसाईटवर याबाबतचं पेज लाईव्ह करण्यात आलं आहे.

अमेझॉन साधारणपणे 15 जानेवारीनंतर या सेलचं आयोजन करु शकते. प्राईम मेंबर्सना एक दिवस आधीच या सेलमध्ये खरेदी करता येईल. याबाबत लवकरच घोषणा होईल. या सेलसाठी अमेझॉनने एसबीआयसोबत करार केला आहे. यामुळे ग्राहकांना एसबीआय कार्ड वापरुन शॉपिंग केल्यास 10 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे.

Amazon Sale in January
Smartphone Under 7K : सात हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत 'हे' स्मार्टफोन; पाहा बेस्ट ऑप्शन्स

इलेक्ट्रॉनिक्सवर मोठा डिस्काउंट

या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्ट टीव्ही आणि अशा बऱ्याच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर मोठी सूट मिळेल. नवीन स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी हा सेल फायद्याचा ठरणार आहे. यामध्ये 5,000 रुपयांपासून स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकणार आहे. याव्यतिरिक्त इतर कॅटेगरीमधील वस्तूंवरही भरघोस सूट असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com