Nokia 5.3 स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मोबाइलवर बंपर सूट

सकाळ ऑनलाइन टीम
Tuesday, 19 January 2021

जर तुम्ही नोकियाचा स्मार्टफोन खरेदी करु इच्छित असाल तर तुम्हाला ही मोठी संधी आहे.

नवी दिल्ली- Amazon Great Republic Day सेल आजपासून (दि.19) प्राइम मेंबर्ससाठी सुरु झाला आहे. तर सामान्य ग्राहक बुधवारपासून सेलमध्ये खरेदी करु शकतील. या सेलमध्ये स्मार्टफोन्ससमवेत अनेक कॅटेगरीच्या प्रॉडक्ट्सवर सूट दिली जात आहे. जर तुम्ही नोकियाचा स्मार्टफोन खरेदी करु इच्छित असाल तर तुम्हाला ही मोठी संधी आहे. Nokia 5.3 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन सेलमध्ये भरपूर डिस्काऊंट आणि ऑफरसह मिळू शकतो. 

मागील वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झालेला Nokia 5.3 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. HMD Global चा हा हँडसेट 10,998 रुपयांत खरेदी करता येईल. विशेष म्हणजे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी बेस व्हेरियंटला कंपनीने 13,999 रुपयांत लाँच केले होते. 10 टक्के बँक ऑफर म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काऊंट (एसबीआय कार्डबरोबर) नंतर या हँडसेटची किंमत कमी होऊन 9,899 राहते. 

हेही वाचा- BSNL चा बेस्ट ब्रॉडबँड प्लॅनः 200 Mbps पर्यंत स्पीड, किंमत 449 रुपयांपासून सुरु

फोनची वैशिष्ट्ये
नोकिया 5.3 स्मार्टफोन स्टॉक अँड्राईडबरोबर बाजारात मिळतो. हा कंपनीचा अशा निवडक फोन्सपैकी एक आहे ज्याचा गुगलमधून रेग्यूलर अँड्राईड अपडेट मिळेल. नोकिया 5.3 मध्ये 6.55 इंच एचडी+डिस्प्ले आहे. कार्ड 512 जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. त्याचबरोबर अनलिमिटेड गुगल ड्राइव्ह स्टोरेजही ऑफर करतो.

नोकिया 5.3 मध्ये 13 मेगापिक्सल प्रायमरी, 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल, 2 मेगापिक्सल डेप्थ आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर देण्यात आले आहे. नोकियाच्या या हँडसेटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 
हेही वाचा- भारतीय बाजारात 5 इलेक्ट्रिक कारचा राहिला दबदबा; जाणून घ्या किंमत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon Great Republic Day Sale Nokia 5 3 On Lowest Price