BSNL चा बेस्ट ब्रॉडबँड प्लॅनः 200 Mbps पर्यंत स्पीड, किंमत 449 रुपयांपासून सुरु

smartphone_additicion_ECM.jpg
smartphone_additicion_ECM.jpg

नवी दिल्ली- भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) ही देशातील दिग्गज ब्रॉडबँड कंपनी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने ऑक्टोबरमध्ये आपल्या प्लॅन्समध्ये काही बदल केले होते. सध्या कंपनीकडे सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन 449 रुपयांचा आहे. यामध्ये 30 Mbps च्या स्पीडबरोबर अनलिमिटेड डेटाची सुविधा देण्यात आली आहे. बीएसएनएलची स्पर्धा रिलायन्स जियो फायबरच्या प्लॅन्सबरोबर आहे. जाणून घेऊयात बीएसएनएलच्या बेस्ट ब्रॉडबँड प्लॅन्सची माहिती. 

BSNLचा 449 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
हा कंपनीचा बेसिक ब्रॉडबँड प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 30 Mbps च्या स्पीडबरोबर 3300GB  (3.3TB) डेटा मिळतो. हे लिमिट संपल्यानंतरही इंटरनेट सुरु राहते. फक्त स्पीड कमी होऊन तो 2 Mbps होईल. डेटाशिवाय प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली आहे. 

BSNL चा 599 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
हा प्लॅन कंपनीच्या 449 रुपयांप्रमाणेच आहे. परंतु, यामध्ये दुप्पट स्पीड देण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना 60 Mbps च्या स्पीडबरोबर 3300GB (3.3TB) डेटा मिळतो. ही मर्यादा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 2 Mbps राहील. डेटाशिवाय प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. 

BSNL चा 777 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
यामध्ये आणखी जास्त स्पीड मिळतो. परंतु, डेटा लिमिट खूप कमी आहे. कंपनीच्या 777 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 Mbps च्या स्पीडबरोबर 500 जीबी डेटा मिळतो. ही लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 5 Mbps होईल. यामध्येही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन फक्त नव्या ग्राहकांसाठी सुरुवातीच्या 6 महिन्यांसाठी मिळतो. त्यानंतर यूजर्सला 849 रुपयांच्या प्लॅनवर मायग्रेट केले जाते. 

BSNL का 799 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
यामध्येही स्पीड 777 रुपयांच्या प्लॅनसारखाच आहे. परंतु, यात डेटा लिमिट जास्त देण्यात आली आहे. 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 Mbps च्या स्पीडबरोबर 3300 जीबी (3.3 टीबी) डेटा मिळतो. ही लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 5 एमबीपीएस राहील. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. 

BSNL चा 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
हा प्लॅन विशेषतः त्या ग्राहकांना आहे ज्यांना चांगल्या स्पीडबरोबर डेटाही गरजेचा आहे. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 एमबीपीएसच्या स्पीडबरोबर 3300 जीबी (3.3 टीबी) डेटा मिळतो. ही लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 5 एमबीपीएस होईल. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com