Apple TV 4K : सामान्यांना परवडणारा Apple चा TV भारतात लॉन्च; फिचर्स आहे स्मार्ट

Apple TV 4K मध्ये A15 Bionic प्रोसेसर देण्यात आला असून, हे मॉडेल मागील मॉडेल पेक्षा 50 टक्के अधिक फास्ट आहे.
Apple TV 4K
Apple TV 4K Sakal

Apple TV 4K : दिवाळीत इलेक्ट्रॉनिक बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. लोकही अनेक दिवसापासून पेंडींग ठेवलेली खरेदी दिवाळी पाडव्याला करतात. याच पार्श्वभूमीवर Apple TV 4K ची न्यु जनरेशन भारतात लॉन्च झाला आहे. Apple TV 4K च्या वाय-फाय मॉडेलची किंमत 14,900 पासून सुरू आहे. याच टिव्हीचे अधीक फिचर्स जाणून घेऊयात. (Apple Smart TV)

esakal
Apple TV 4K
आता 'स्मार्ट टिव्ही' खरेदी करण्याची काही गरज नाही; आपल्या साध्या टिव्हीलाच बनवा 'Smart Tv'
L E D Tv
L E D TvSakal

Apple TV 4K चे दोन मॉडेल्स लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये Wi-Fi-only आणि Wi-Fi + Ethernet मॉडेलसोबत Siri Remote सेट देण्यात आला आहे. या टिव्हीमध्ये A15 Bionic चिपसेट वापरण्यात आले आहे. त्यामुळे वीडियो डिकोडिंग, ऑडियो प्रोसेसिंग दर्जेदार होईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Apple TV 4K
Amazon Sale मध्ये २५ हजारांत खरेदी करा ४३ इंच Smart TV; पाहा यादी

Apple TV 4K ची किंमत

Apple TV 4K च्या W-Fi only मॉडेलसाठी ग्राहकांना 14,900 रुपये मोजावे लागतील. या मॉडेलमध्ये 64GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तर, Wi-Fi + Ethernet मॉडेलची किंमत 16,900 आहे. यामध्ये 128GB मेमरी देण्यात आली आहे.

Sakal
Apple TV 4K
ब्रॅंडेड कंपन्यांचे महागडे 55 इंची Smart TV आता तुमच्या बजेटमध्ये!

Apple TV 4K चे स्पेसिफिकेशन्स

Apple TV 4K मध्ये A15 Bionic प्रोसेसर दिला असून तो मागील मॉडेल पेक्षा 50 टक्के अधिक फास्ट आहे. हा प्रोसेसर फास्टर नेविगेशन आणि स्नेपियर UI अ‍ॅनिमेशनसह येतो. तर GPU चा परफॉर्मन्समध्ये 30 टक्क्यांपर्यंत सुधारणा करण्यात आली आहे.

Apple TV 4K
Apple Watch ने वाचवला वापरकर्त्याचा जीव; 'हे' खास फीचर ठरलं जीवनदायी

Apple TV 4K ला HDR10+ चा सपोर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरीक्त हा टीव्ही Dolby Vision ला सपोर्ट करतो. तेसच Dolby Atmos, Dolby Digital 7.1 आणि Dolby Digital 5.1 सराउंड साउंडलाही सपोर्ट करतो. tvOS सहज वापरता यावा यासाठी या टीव्हीसोबत Siri Remote टच-एनेबल्ड क्लिकपॅड देण्यात आले आहे.

Apple TV 4K
Smart watch : स्मार्ट वॉच खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

घर बसल्या मोठ्या स्क्रिनवर कार्यक्रम बघता यावेत यासाठी Apple TV 4K Apple हा बेस्ट ऑप्शन आहे. आता लॉन्च केलेले मॉडेल सर्वसमावेशक असे असून, Apple TV 4K कंपनीच्या इतर डिव्हाईससोबत सहज कनेक्ट होतो. त्यामुळे हे मॉडेल युजर फ्रेंडली आहे. त्यामुळे हे मॉडेल नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस पडेल, असा विश्वास Apple चे वर्ल्डवाइड प्रोडक्ट मार्केटिंग उपाध्यक्ष बॉब बोरचर्स यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com