
Amazon Sale: ब्रँडेड स्मार्टवॉचवर 60 टक्क्यांपर्यंत सूट, सॅमसंग-अमेझफिटवर खास ऑफर्स
Smartwatch Sale on Amazon: अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर स्मार्टवॉचसाठी खास सेल सुरू आहे. या काळात तुम्ही लोकप्रिय स्मार्टवॉच ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळवून खरेदी करू शकता. सेलमध्ये, तुम्हाला Samsung ते Amazfit आणि Titan सारख्या लोकप्रिय कंपन्यांकडून स्वस्त किंमतीत स्मार्टवॉच मिळतील.
Noise ColorFit Pulse Spo2 (60% सूट)-
नॉइसचे हे स्मार्टवॉच Amazon वर 60 टक्के सूटीसह मिळत 1,999 रुपयांना विकले जात आहे. हे स्मार्टवॉच 10 दिवसांची बॅटरी लाइफ, 60+ वॉच फेस, 1.4 इंच फुल टच एचडी डिस्प्ले स्मार्टवॉच, 24*7 हार्ट रेट मॉनिटर, पुरुष आणि महिलांसाठी स्लीप मॉनिटरिंग आणि IP68 वॉटरप्रूफ रेटिंगसह येते.
हेही वाचा: Ambrane Wise Eon watch : चार्जिंग केल्यावर १० दिवस चालणारं २ हजारांचं स्मार्टवॉच
Samsung Galaxy Watch 4 (49 टक्के सूट)-
सॅमसंग गॅलेक्सी वॉच 4 ची किंमत 29,999 रुपये आहे, परंतु Amazon वर 49% सवलतीनंतर ते 15,387 रुपयांना उपलब्ध आहे. हे अँड्रॉइड स्मार्टफोनशी कनेक्ट केलं जाऊ शकते आणि ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, बॉडी कंपोजिशन एनालिसिस, आरोग्य निरीक्षण आणि 90 पेक्षा जास्त वर्कआउट मोडसह येते.
Amazfit GTR 2e स्मार्ट वॉच (48% सूट)-
Amazfit वरील या स्मार्टवॉचची किंमत 14,999 रुपये आहे, परंतु Amazon वर 48 टक्के सूट देऊन ते 7,799 रुपयांना विकले जात आहे. यामध्ये वक्र (Curved) डिझाइन, 1.39 नेहमी चालू असलेला AMOLED डिस्प्ले, SpO2 आणि स्ट्रेस मॉनिटर, अलेक्सा, इनबिल्ट GPS, 24-दिवसांची बॅटरी लाइफ, 90+ स्पोर्ट्स मॉडेल्स, 50+ वॉचफेस यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
हेही वाचा: ३५० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी
टायटन स्मार्ट प्रो स्मार्टवॉच (२० टक्के सूट)-
हे स्मार्टवॉच 20 टक्के सूट देऊन 11,995 रुपयांना विकले जात आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात AMOLED डिस्प्ले, GPS, तापमान, तणाव आणि स्लीप मॉनिटर, मल्टीस्पोर्ट ट्रॅकर, SpO2, महिला आरोग्य मॉनिटर आणि 14 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
Web Title: Amazon Sale Up To 60 Discount On Branded Smartwatch Special Offers On Samsung Amazonfit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..