Amazonचा मोठा निर्णय! मोबाईलवरून किंडल बुक्स खरेदी करणं आता अशक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon Kindle
Amazonचा मोठा निर्णय! मोबाईलवरून किंडल बुक्स खरेदी करणं आता अशक्य

Amazonचा मोठा निर्णय! मोबाईलवरून किंडल बुक्स खरेदी करणं आता अशक्य

किंडल बुक्स खरेदी करणं आता अवघड होणार आहे. विशेषतः अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी! पूर्वी किंडल बुक्स ही अॅन्ड्रॉईड फोनवर अॅमेझॉनच्या अॅपवरून घेता येत होती, मात्र आता ही सुविधाही बंद होत आहे. यापूर्वी iOS युजर्सनाही यासाठी अॅमोझॉनने कधीच परवानगी दिली नव्हती.

त्यामुळे आता जेव्हा तुम्ही तुमच्या अॅन्ड्रॉईड फोनवरील अॅमेझॉन अॅपवरून किंडल बुक विकत घेण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्यासमोर एक वेगळी स्क्रिन दिसेल, ज्यावर तुम्ही पुस्तक खरेदी करू शकत नाही असा मेसेज दिसेल. तसंच जर तुम्ही अॅप अपडेट जरी केलंत तरी तुम्हाला असाच मेसेज स्क्रिनवर दिसेल. iOS युजर्सना हा मेसेज पूर्वीपासूनच दिसत होता. पण आता अॅन्ड्रॉईड फोनवरही हा मेसेज येणार आहे.

हेही वाचा: कोणत्याही भारतीय कार्डने पेमेंट होणार नाही; Apple चा मोठा निर्णय

तुम्ही ज्या वेळी किंडल बुक खरेदी करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा “To remain in compliance with the Google Play Store policies, you will no longer be able to buy new content from the app. You can build a reading list on the app and buy on [the] Amazon website from your browser” हा मेसेज दिसेल.

मग आता किंडल बुक कसे विकत घेता येईल?

अॅन्ड्रॉईड फोनवरून किंडल बुक विकत घेता येत नसले तरी लॅपटॉपवरून मात्र ही पुस्तकं खरेदी करण्यात येणार आहेत. लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या ब्राऊजरमध्ये जाऊन amazon.com टाईप करून त्या साईटवरून किंडल बुक्स खरेदी करता येऊ शकणार आहेत.

Web Title: Amazon Will No Longer Allow Users To Buy Kindle Books On Android

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top