
कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कंपन्यांनी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. भारतात अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने मोबाइल एडिशन बुधवारी लाँच केलं आहे.
नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे थिएटर्स बंद करण्यात आली होती. यावेळी घरीच अडकून पडलेले लोक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन दिसायला लागले. यातच मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षक वळले. याच पार्श्वभूमीवर कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कंपन्यांनी अनेक ऑफर्स दिल्या आहेत..
भारतात अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन बुधवारी लाँच केलं आहे. हा प्लॅन युजर्सना महिन्याला 89 रुपयांमध्ये मिळणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारख्या कंपन्यांशी असलेल्या स्पर्धेत ही सेवा सुरु केली आहे. यासाठी अॅमेझॉनने एअरटेलसोबत टायअप केलं आहे.
हे वाचा - Telegram ने पुन्हा उडवली Whatsapp ची खिल्ली; शेअर केलं मीम
एअरटेलच्या प्रीपेड युजर्सना याचा फायदा घेता येतो. तसंच एअरटेलचे युजर्स 30 दिवसांपर्यंत प्राइम व्हिडिओच्या फ्री ट्रायलचा आनंद घेऊ शकतात. फ्री सब्सक्रिप्शन मिळण्यासाठी ग्राहकांना एअरटेलचे थँक्स अॅप वापरावे लागेल.
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे संचालक आणि भारतातील जनरल मॅनेजर गौरव गांधी यांनी सांगितलं की, स्मार्टफोन मनोरंजनासाठी परवडणारं माध्यम बनलं आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून जास्ती जास्त युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्लॅन लाँच करण्यात आला आहे.
हे वाचा - WhatsApp वरुन Signal वर ट्रान्सफर होताय? ग्रुप आहे तसा हलवण्याची ही वाचा सोपी पद्धत
सध्या अॅमेझॉनची स्पर्धा नेटफ्लिक्सशी आहे. नेटफ्लिक्सने 2020 मध्ये मोबाइलसाठी एक सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला होता. भारतात 199 रुपयांमध्ये मोबाइल सबस्क्रिक्शनचा प्लॅन दिला होता.