Telegram ने पुन्हा उडवली Whatsapp ची खिल्ली; शेअर केलं मीम

टीम ई सकाळ
Tuesday, 12 January 2021

व्हॉटसअ‍ॅपच्या या घोषणेनंतर टेलिग्राम आणि सिग्नल अ‍ॅपच्या वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. व्हॉटसअ‍ॅपला पर्याय म्हणून सर्वाधिक पसंती असलेल्या टेलिग्रामने आता व्हॉटसअ‍ॅपची खिल्ली उडवली आहे. 

नवी दिल्ली - व्हॉटसअ‍ॅप त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल करत आहे. त्यांच्या या घोषणेनुसार फेसबुकला डेटा शेअरींग वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर युजर्सनी व्हॉटसअ‍ॅपच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. व्हॉटसअ‍ॅपला पर्यायी अ‍ॅपचा वापर करण्यास युजर्सनी सुरुवात केली आहे.

व्हॉटसअ‍ॅपच्या या घोषणेनंतर टेलिग्राम आणि सिग्नल अ‍ॅपच्या वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. व्हॉटसअ‍ॅपला पर्याय म्हणून सर्वाधिक पसंती असलेल्या टेलिग्रामने आता व्हॉटसअ‍ॅपची खिल्ली उडवली आहे. 

हे वाचा - WhatsApp वरुन Signal वर ट्रान्सफर होताय? ग्रुप आहे तसा हलवण्याची ही वाचा सोपी पद्धत

याआधी दोन स्पायडर मॅन मीमसह फेसबुकच्या युजरचा डेटा शेअर करण्याच्या व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीची खिल्ली उडवली होती. आता टेलिग्रामने आणखी एक मीम शेअर केलं आहे. रविवारी टेलिग्रामने व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा एक स्नॅपचॅट शवपेटीच्या मीमसह ट्विट केला. 

हे वाचा - नव्या अपडेटप्रकरणी WhatsApp म्हणतं घाबरण्याचं कारण नाही!

व्हॉटसअ‍ॅपवर टेलिग्रामने तयार केलेलं हे मीम प्रचंड व्हायरल झालं आहे. याआधी टेलिग्रामने व्हॉटसअ‍ॅपवर नो कॅप्शन नीड म्हणत मीम शेअर केलं होतं. 

हे वाचा - कोणत्याही अ‍ॅपचं ग्रुप चॅट आता Signal वर; WhatsApp ला 'सुरक्षित' टक्कर

टेलिग्रामसह सिग्नल अ‍ॅपही सध्या चर्चेत आहे. शनिवारी त्यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये सिग्नल हे मोफत अ‍ॅप्सच्या यादीमध्ये दिसतं आणि व्हॉटसअ‍ॅपला दुसऱ्या स्थानी दाखवण्यात आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: telegram share another meme target whatsapp