Whatsapp वर मेसेज आता शेड्यूल करता येणार

व्हॉट्सअपने कोणतेही नवीन फिचर आणलेले नाही
Whatsapp Schedule Messages
Whatsapp Schedule Messages esakal

Whatsapp वर सध्या खूप फिचर्स पाहायला मिळत आहेत. पण एका फिचर्सची उणीव युझर्सना जाणवत होती. ती उणीव भरून काढली आहे. इतके दिवस व्हॉट्सअप मेसेज शेड्यूल करता येत नव्हते. आता, अँड्रॉइड आणि आयफोनवर मेसेज शेड्यूल करता येणार आहेत. मात्र, WhatsApp ने मेसेज शेड्यूल करण्यासाठी कोणतेही नवीन फिचर आणलेले नाही. मात्र काही तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्हाला मेसेज शेड्यूल करता येऊ शकतात. त्याचा फायदा अनेकांना होणार आहे. समजा रात्री १२ वाजता कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर, त्यासाठी १२ पर्यंत जागण्याची गरज नाही. तुम्ही तो मॅसेज शेड्यूल करू शकता. एंड्रोइड आणि आयफोनवर हे मेसेज कसे शेड्यूल करायचे ते पाहणे गरजेचे आहे.

Whatsapp Schedule Messages
फोन स्लो चालतोय? गुगल क्रोममधून Cookies, Cache करा क्लिअर
WhatsApp
WhatsAppSakal

अँड्रॉइडवर Whatsapp मेसेज शेड्यूल करताना (How To Schedule WhatsApp Message On Android)

Android डिव्हाइस वापरत असल्यास, तुम्ही अनेक थर्ट पार्टी अॅप्सच्या मदतीने WhatsApp वर संदेश शेड्यूल करू शकता. यासाठी एन्ड्रोईडवर SKEDit हे अॅप फायदेशीर आहे. त्याच्या मदतीने तुम्ही अशाप्रकारे मेसेज शेड्यूल करू शकता.

१) गुगल प्ले स्टोअरवर जाऊन SKEDi अॅप डाऊनलोड करून इंन्स्टॉल करा.

२) त्यानंतर साइन इन करा. त्यानंतर मेनूमध्ये WhatsApp वर क्लीक करा.

३) यानंतर अॅप तुम्हाला काही गोष्टींची परमिशन मागेल. ती दिल्यावर Enable Accessibility वर क्लीक करून परत SKEDit वर जा आणि टॉगल ऑन करा. त्यानंतर तुम्हाला Allow वर क्लीक करायचे आहे.

४) त्यानंतर अॅपवर जा. तिथे तुम्हाला मेसेज शेड्यूल करता येतील. ज्या व्यक्तीला मॅसेज पाठवायचा आहे त्याला मजकूर लिहा. त्यानंतर तारीख आणि वेळ सेट करा. इथे तुम्हाला हाच मेसेज पुन्हा पाठवण्यासाठी पर्यायही विचारला जाईल,

५) त्यानंतर तुम्हाला खाली टॉगल दिसेल. तिथे गेल्यावर Ask Me Before Sending हा पर्याय मिळेल. जर तुम्ही ऑन करून मेसेज शेड्यूल करणार असाल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यावर क्लीक केल्यावर मेसेज पाठवला जाईल. जर तुम्ही हा पर्याय स्विकारला नाहीत तर नोटिफिकेशनशिवायही मेसेज पाठवला जाईल. मित्राला वाढदिवसासाठी शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही नोटिफिकेशन बंदही ठेवू शकता.

Whatsapp Schedule Messages
Mobile Number: आपला मोबाईल नंबर १० अंकीच का असतो? जाणून घ्या

आयफोनवर Whatsapp मेसेज शेड्यूल करताना (How To Schedule WhatsApp Message In iPhone)

आयएओएसमध्ये व्हॉट्सअप मॅसेज शेड्यूल करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप उपलब्ध नाहीये. पण तुम्ही एक वेगळा मार्ग वापरू शकता. Siri Shortcuts या अॅपलसाठी असणाऱ्या अॅपचा मेसेज शेड्यूल करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. यासाठी असा मार्ग आहे.

१) अॅप स्टोअरवर जाऊन Shortcuts app आयफोनवर डाऊनलोड करून इंस्टॉल करा.

२) त्यानंतर Automation वर क्लीक करा. त्यानंतर उजवीकडे वरच्या कॉर्नरवर असलेल्या + आयकॉनवर वर जा आणि Create Personal Automation वर क्लीक करा.

३) पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला Time of Day वर क्लीक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ज्यांना मेसेज पाठवायचा आहे त्यांना शेड्यूल करा. त्यानंतर Next बटण दाबा.

४) आता Add Action वर क्लिक करा आणि सर्च बार वर जाऊन Text टाइप करा. त्यानंतर खाली एक लिस्ट येईल. तेथे Text ला सिलेक्ट करा.

५) आता Text वर जाऊन तुम्हाला जो मेसेज शेड्यूल करून पाठवायचा आहे, तो मेसेज टाईप करा.

६) आता मेसेज बॉक्सच्या खाली तुम्हाला एक + आयकॉन दिसेल. त्यावर क्लीक करा आणि सर्च बारवर जाऊन व्हॉट्सअप सर्च करा.

७) येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तेथे तुम्हाला Send Message via WhatsApp सिलेक्ट करायचे आहे. आता ज्याला मेसेज पाठवायचा आहे त्याचा नंबर निवडा आणि Next वर क्लिक करा. शेवटच्या स्क्रीनवर तुम्हाला Done वर क्लीक करायचे आहे.

८) आता शेड्यूल टाईमवर Shortcuts app द्वारे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यावर क्लीक केल्यावर तुमचे WhatsApp ओपन होऊन टाईप केलेला मेसेज तुम्हाला दिसेल. तो मेसेज तुम्हाला फक्त पाठवायचा आहे.

Whatsapp Schedule Messages
तुमचा फोन सतत हँग होतोय? या काही बेसिक सेटिंग सोडवतील प्रॉब्लेम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com