Hacking Prevention Tips : कधीच हॅक होणार नाही तुमचा मोबाईल; आत्ताच डिलीट करून टाका 'हे' 3 अ‍ॅप

Hacking Prevention Tips : मोबाईल सुरक्षेसाठी वापरकर्त्यांनी तात्काळ काही अ‍ॅप्स डिलीट करावे लागणार आहेत.
Hacking Prevention Tips
Hacking Prevention Tipsesakal
Updated on

अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि धोकादायक इशारा समोर आला आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून दोन अ‍ॅप्स हटवले आहेत, कारण यामध्ये ‘Necro Trojan’ नावाचा अत्यंत घातक व्हायरस सापडला आहे. हा व्हायरस केवळ तुमचा मोबाईल डेटा चोरण्यापुरताच मर्यादित नाही, तर तो हॅकर्सना तुमच्या डिव्हाइसवर इतर मालवेअर अ‍ॅप्स देखील चुकीच्या पद्धतीने डाउनलोड करून देतो.

कोणत्या अ‍ॅप्स आहेत धोक्यात?

गुगलने प्ले स्टोअरवरून हटवलेल्या या दोन अ‍ॅप्स म्हणजे Spotify आणि WhatsApp च्या ‘modded’ म्हणजेच बनावट किंवा बदललेल्या आवृत्त्या आहेत. अनेक युजर्स थेट प्ले स्टोअरऐवजी थर्ड पार्टी वेबसाइटवरून हे अ‍ॅप्स डाउनलोड करतात आणि त्यातूनच Necro Trojan हा घातक व्हायरस डिव्हाइसमध्ये प्रवेश करतो.

‘Necro Trojan’ व्हायरस

हा व्हायरस प्रथम 2019 मध्ये प्रसिद्ध CamScanner अ‍ॅपमध्ये आढळून आला होता. त्या वेळी या अ‍ॅपचे १० कोटींपेक्षा अधिक डाऊनलोड्स झाले होते. त्यावेळी सुरक्षेचा पॅच देऊन समस्या सोडवण्यात आली होती. पण आता पुन्हा तोच व्हायरस Wuta Camera आणि Max Browser या अ‍ॅप्समध्ये आढळून आला असून, गुगलने ही अ‍ॅप्स देखील प्ले स्टोअरवरून हटवली आहेत.

Hacking Prevention Tips
Whatsapp Earning Source : मोफत सेवा देणारे व्हॉट्सअ‍ॅप पैसे कसे कमावते? जाणून घ्या 'फ्री' प्लॅटफॉर्ममागचं मोठं रहस्य..

गेमिंग अ‍ॅप्सही धोक्यात

विशेष म्हणजे, Necro Trojan आता केवळ सोशल मीडिया किंवा युटिलिटी अ‍ॅप्सपुरताच मर्यादित राहिलेला नाही. तो Minecraft, Stumble Guys, Car Parking Multiplayer, Melon Sandbox यांसारख्या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅप्सच्या ‘modded’ आवृत्त्यांमध्येही आढळून येत आहे. त्यामुळे गेमिंग शौकिनांनी देखील सजग राहणं अत्यावश्यक आहे.

युजर्सनी काय करावे?

  1. तुमच्या मोबाईलमध्ये Spotify, WhatsApp यासारखी modded अ‍ॅप्स असतील, तर तात्काळ ती डिलीट करा.

  2. कोणतेही अ‍ॅप थेट प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा. अनधिकृत किंवा थर्ड पार्टी वेबसाइट्स टाळा.

  3. मोबाईलमध्ये अँटीव्हायरस अ‍ॅप्स वापरून वेळोवेळी स्कॅनिंग करा.

  4. अनोळखी लिंक किंवा फिशिंग ईमेल्सवर क्लिक करू नका.

Hacking Prevention Tips
Mobile Launch June 2025 : जून महिना मोबाईल प्रेमींसाठी एकदम खास! लाँच होणार 'हे' 5 दमदार स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत बघाच..

iOS युजर्ससाठी देखील अलर्ट

दुसरीकडे iPhone आणि iPad वापरकर्त्यांसाठीही सुरक्षा इशारा देण्यात आला आहे. CERT-In या भारत सरकारच्या सायबर सुरक्षा संस्थेनुसार, iOS 18 किंवा iPadOS 18 च्या जुन्या आवृत्त्यांमध्ये सिरीयस सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे युजर्सनी आपली डिव्हाइस त्वरित नवीनतम व्हर्जनवर अपडेट करावी. जुन्या डिव्हाइससाठी किमान iOS 17.7 आणि iPadOS 17.7 वर अपडेट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

डिजिटल युगात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे अ‍ॅप्स डाउनलोड करताना अधिक जागरूक रहा, अनधिकृत स्रोतांपासून दूर रहा आणि तुमचं डिव्हाइस अपडेट ठेवणं हीच सध्या सर्वोत्तम सायबर सुरक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com