
Android Mobile Security Alert : भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघटना (CERT-In) ने अँड्रॉइड 12 ते 15 या एडिशनवरील मोबाईलवर गंभीर सुरक्षेचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. या त्रुटींमुळे सायबर हल्लेखोर संवेदनशील डेटा मिळवू शकतात, उपकरणाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, किंवा डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DoS) सारख्या हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो.
CERT-In च्या इशाऱ्यानुसार, खालील अँड्रॉइडमध्ये समस्या दिसून आल्या आहेत.
अँड्रॉइड 12
अँड्रॉइड 12L
अँड्रॉइड 13
अँड्रॉइड 14
अँड्रॉइड 15
या त्रुटी अँड्रॉइडच्या मुख्य घटकांमध्ये आणि MediaTek, Qualcomm, Imagination Technologies यांसारख्या थर्ड पार्टी पुरवठादारांच्या प्रणालींमध्ये आहेत.
या त्रुटींचा गैरफायदा घेतल्यास वापरकर्त्यांना खालील समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
डेटा चोरी: हल्लेखोर परवानगीशिवाय वैयक्तिक किंवा व्यावसायिक डेटा चोरू शकतात.
फोन क्रॅश होणे: या त्रुटींमुळे उपकरणे अस्थिर होऊ शकतात किंवा सतत क्रॅश होऊ शकतात.
DoS हल्ले: उपकरणाचे कार्य पूर्णपणे बंद पडू शकते.
सुरक्षिततेसाठी CERT-In ने काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत.
1. सिस्टम अपडेट करा: Google किंवा तुमच्या डिव्हाइसच्या निर्माता कंपनीकडून आलेले लेटेस्ट पॅच लगेच इन्स्टॉल करा. यासाठी Settings > System Upgrade या पर्यायाचा वापर करा.
2. विश्वासार्ह अॅप्सच डाऊनलोड करा: फक्त Google Play Store सारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर करा. अनधिकृत अॅप्स साईडलोड करणे टाळा.
3. सुरक्षा सेटिंग्ज अॅक्टिव्हेट करा: अॅप परवानग्या, दोन-स्तरीय प्रमाणीकरण (2FA), आणि उपकरण एन्क्रिप्शन वापरा.
4. उपकरणावर लक्ष ठेवा: मोबाईल अचानक क्रॅश होणे, बॅटरी झपाट्याने संपणे यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
CERT-In ने अँड्रॉइड वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षेसाठी सक्रिय पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. नियमित अद्यतने आणि काळजीपूर्वक अॅप वापर यामुळे तुम्ही सायबर धोके टाळू शकता. तुमच्या डिजिटल सुरक्षा अनुभवासाठी हे पावले महत्त्वाची ठरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.