

https://www.tv9marathi.com/maharashtra/big-action-by-the-fda-in-pune-license-of-inducare-pharmaceutical-company-cancelled-shocking-details-emerge-1812558.html
sakal
San Francisco: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाण्याचा इशारा देणारे अँथ्रोपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डारियो अमोडेई यांचे एक विधान सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. बेरोजगारांचा उद्वेग कमी करण्यासाठी त्यांना व्हिडिओ गेम्स खेळायला देण्याचा पर्याय सुचवला होता. सध्या एकीकडे अनेकांच्या नोकऱ्या एआयमुळे जात असल्याचे चित्र दिसत आहेत. दुसरीकडे सध्या नवनव्या व्हिडिओ गेम्सही चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमोडेई यांच्या विधानाची लोकांना आठवण झाली आहे.