Anthropic AI
esakal
AI म्हटलं की आतापर्यंत ChatGPT आणि OpenAI ही नावं प्रामुख्याने समोर यायची. मात्र, आता Anthropic या कंपनीने संपूर्ण टेक इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेतलं आहे. Claude AI हे कंपनीचं प्रमुख उत्पादन असून, त्याचा वापर आता केवळ प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नाही, तर मोठमोठी कामं पूर्ण करण्यासाठीही केला जात आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी कंपनीने IPO च्या माध्यमातून ८१.३ अब्ज डॉलर उभारले असून, तिचं व्हॅल्यूएशन जवळपास १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.