Appleला चीनची भीती? पुरवठादारांना नियमांचे पालन करण्याचे दिले आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple

Appleला चीनची भीती? पुरवठादारांना नियमांचे पालन करण्याचे दिले आदेश

चीन आणि तैवानमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम बाजारावर दिसू लागला आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांसाठी दोन्ही देश महत्त्वाचे आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या नुकत्याच झालेल्या तैवान दौऱ्यामुळे चीन संतापला आहे. चीन तैवानला वेढा घालून फायर ड्रिल करत आहे.

या कारणांमुळे कंपन्यांना व्यवसायाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दिग्गज स्मार्टफोन निर्माता ॲपलने आपल्या पुरवठादारांना चीनच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

कंपनीने तैवानमधून चीनला जाणाऱ्या शिपमेंटसाठी चिनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी, Appleने आपल्या पुरवठादारांना सांगितले की, चीनने तैवानमध्ये बनवलेल्या भागांवर कठोर नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: चीनच्या विमानाच्या तैवान सीमेवर घिरट्या

'चीनचे नियमानचे पालन करा'

Nikkei Asia शी संबंधितांनी सांगितले की, Apple ने पुरवठादारांना याबाबत चेतावणी दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की तैवान ते चीन प्रवास करणारे भाग आणि घटकांना 'तैवान, चायना' किंवा 'चायनीज ताइपे' असे लेबल लावावे. अमेरिकन कंपनीने पुरवठादारांना या प्रकरणात गती दाखवण्यास सांगितले आहे, जेणेकरून वस्तू आणि घटकांना छाननीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये.

हेही वाचा: USA-China Conflict : चीनच्या 68 विमानांसह, १३ युद्धनौकांनी ओलांडली मेडिअन लाईन

Web Title: Apple Afraid Of China Suppliers Were Ordered To Comply With The Rules

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..