मस्कच्या टेस्लाला टक्कर द्यायला येतेय Apple ची हटके कार, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये |Apple Car | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple Car

Apple Car: मस्कच्या टेस्लाला टक्कर द्यायला येतेय Apple ची हटके कार, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये

Apple New Car Launch Soon: दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलला आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट आणि इयरबड्ससाठी ओळखले जाते. कंपनीचे सर्व डिव्हाइस शानदार फीचर्ससह येतात. परंतु, कंपनी आता ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅपल लवकरच आपल्या नवीन कारला लाँच करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कारची चर्चा सुरू आहे.

रिपोर्टनुसार, अ‍ॅपलच्या या नवीन कारला ठराविक बाजारपेठांसाठी डिझाइन केले जाईल. ही कार सर्व देशांमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. कार आपल्या सेगमेंटमधील इतर कारच्या तुलनेत स्वस्त असण्याची शक्यता आहे. लाँचनंतर ही कार मर्सिडीज, टेस्ला, GM हमर EV आणि अन्य इलेक्ट्रॉनिक सेडानला टक्कर देईल.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

Apple कारमध्ये काय असेल खास

Apple सेल्फ-ड्राइव्हिंग कारला लाँच करण्याचे प्लॅनिंग अनेक दिवसांपासून करत आहे. नवीन रिपोर्टनुसार ही कार वर्ष २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने जवळपास ८ वर्षांपूर्वी सेल्फ-ड्राइव्हिंग कारवर काम करण्यास सुरुवात केली होती. या कारची किंमत १ लाख डॉलर (जवळपास ८१ लाख रुपये) असू शकते. Apple च्या या कारमध्ये सेटअरिंग व्हील आणि पॅडल्स नसतील, असेही काही रिपोर्ट समोर आले होते. परंतु, कंपनीची अशी कोणतीही योजना नाही. ही कार देखील इतर गाड्यांप्रमाणेच सेटअरिंग व्हील आणि पॅडल्ससह येईल.

हेही वाचा: Jio 5G: जिओ यूजर्सला मिळणार सुपरफास्ट इंटरनेटचा फायदा, ५जी साठी करा फक्त 'एवढ्या' किंमतीचा रिचार्ज

Apple कारचे स्पेसिफिकेशन्स

मर्सिडीज आणि टेस्लाला कारला टक्कर देण्यासाठी येणाऱ्या Apple च्या कारमध्ये सिलिकॉन चिपसेटचा (Apple Silicon Chipset) वापर केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार ही चिपसेट Apple च्या हाय-एंड MAC Chip च्या चारपट पॉवरफुल असेल.

किती असेल कारची किंमत?

रिपोर्टनुसार, Apple कारची किंमत जवळपास १ लाख डॉलर (जवळपास ८० लाख रुपये) असण्याची शक्यता आहे. कंपनी यापेक्षा कमी किंमतीत कारला लाँच करू शकते. लाँच तारखेबाबत सांगायचे तर ही कार वर्ष २०२६ मध्ये बाजारात एंट्री करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: WhatsApp Pay India : व्हॉट्सॲप पे इंडियाचे प्रमुख विनय चोलेट्टी यांचा राजीनामा, कारण...

टॅग्स :carapple