
सबीह खान यांची अॅपलच्या COO पदावर नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी ३० वर्षे अॅपलमध्ये विविध भूमिका सांभाळत नेतृत्व केले आहे.
ही नियुक्ती अॅपलच्या दीर्घकालीन नेतृत्व योजनेंतर्गत झाली आहे.
जगातील आघाडीची टेक्नॉलॉजी कंपनी Apple Inc. ने भारतीय वंशाचे सबीह खान यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Operating Officer – COO) म्हणून नियुक्ती केली आहे. तब्बल ३० वर्षांपासून Apple सोबत असलेल्या खान यांची ही नियुक्ती कंपनीच्या दीर्घकालीन नेतृत्वाच्या योजनेंतर्गत करण्यात आली असून, त्यांनी जेफ विल्यम्स यांची जागा घेतली आहे. जेफ विल्यम्स यांचा निवृत्तीपर्यंतचा कार्यकाळ असून, ते CEO टिम कुक यांच्यासोबत काम करत राहणार आहेत.
सबीह खान यांचा जन्म १९६६ साली उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. त्यांच्या शालेय शिक्षणासाठी कुटुंब सिंगापूरला स्थलांतरित झाले आणि त्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी टफ्ट्स युनिव्हर्सिटी येथून अर्थशास्त्र आणि यांत्रिकी अभियांत्रिकी या दोन शाखांमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर रेन्सीलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट (RPI), न्यूयॉर्क येथून यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
१९९५ साली GE Plastics मध्ये अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट इंजिनीयर म्हणून काम केल्यानंतर, सबीह खान यांनी अॅपलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन्स विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आणि २०१९ मध्ये Senior Vice President of Operations या पदावर नियुक्त झाले. या पदावर काम करत असताना त्यांनी Apple च्या जागतिक पुरवठा साखळी (Global Supply Chain) आणि शाश्वत धोरणे (Sustainability Strategy) यांची मांडणी आणि अंमलबजावणी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
विशेषतः COVID-19 महामारीच्या काळात त्यांनी आपल्या कार्यक्षम नेतृत्वातून अॅपलच्या उत्पादन साखळीला गतिमान ठेवले आणि कमीत कमी अडथळ्यांतून कंपनीची उत्पादकता अबाधित ठेवली.
अॅपलचे CEO टिम कुक यांनी खान यांचे स्वागत करताना त्यांना “brilliant strategist” आणि “central architect” असं संबोधलं. त्यांनी म्हटले की, “सबीह यांनी केवळ पुरवठा साखळीच नव्हे तर अमेरिकेतील उत्पादन विस्तार, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि अॅपलची कार्बन फूटप्रिंट ६०% नी घटवणे या सगळ्या क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी केली आहे.”
कुक यांनी हेही नमूद केले की, “सबीह हे आपल्या मूल्यांनुसार आणि मनापासून नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. मला खात्री आहे की ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अपवादात्मक कामगिरी करतील.”
या नियुक्तीनंतर सबीह खान हे अॅपलमधील सर्वात वरिष्ठ भारतीय वंशाचे अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या नेमणुकीने जागतिक नेतृत्वात विविधता आणि समावेशाचा अॅपलचा दृष्टिकोन अधोरेखित होतो.
ही नियुक्ती केवळ एक प्रशासकीय बदल नसून, भारतीय प्रतिभेला जागतिक स्तरावर मिळालेल्या मान्यतेचं प्रतीक आहे. टेक्नॉलॉजीच्या जगतात भारताचं योगदान दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत असल्याचं हे ठळक उदाहरण आहे.
Apple कंपनीचे नवीन COO कोण आहेत?
➤ अॅपलने सबीह खान यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) म्हणून नियुक्ती केली आहे.
सबीह खान यांचा जन्म आणि शिक्षण कुठे झाले?
➤ सबीह खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला आणि त्यांनी अमेरिका व सिंगापूरमध्ये शिक्षण घेतले.
Apple मध्ये सबीह खान यांनी कोणती महत्त्वाची कामगिरी केली आहे?
➤ त्यांनी कंपनीच्या जागतिक पुरवठा साखळीची योजना आखली, उत्पादन वाढवले आणि पर्यावरणपूरक धोरणांवर काम केले.
सबीह खान यांच्या नियुक्तीबाबत टिम कुक यांनी काय म्हटले आहे?
➤ टिम कुक यांनी सबीह खान यांचे कौतुक करत त्यांना “उत्कृष्ट रणनीतीकार” आणि “मूल्यांवर आधारित नेता” असे संबोधले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.