Apple Festive Offer : Apple च्या फेस्टिव्ह ऑफरमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर मिळतेय १० हजारांपेक्षा जास्त सूट

iPhone 15 series वर सुद्धा 6000 हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. चला तर या ऑफर्सबाबत सविस्तर जाणून घेऊया
Apple Festive Offer
Apple Festive Offeresakal

Apple Festive Offer : दसरा दिवाळीला विविध प्रोडक्ट्सवर ई-कॉमर्स कंपन्या भारी सूट देतात. अॅपलचा दिवळी सेल लाइव्ह असून कंपनी iPads आणि Macbooks वर भारी डिस्काउंट देत आहे. सोबतच iPhone 15 series वर सुद्धा 6000 हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. चला तर या ऑफर्सबाबत सविस्तर जाणून घेऊया.

15 इंच मॅकबुक एअर मॉडेल्सवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. हे मॉडेल M2 चिपसह आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना ही सूट मिळेल. मात्र, मॅकबुकच्या मूळ किमतीवर फ्लॅट डिस्काउंट दिला जात नाही.

Apple Festive Offer
Smart TV Offers : दिवाळीपूर्वीच घरी आणा स्मार्ट टीव्ही, मोठ्या स्क्रीनवर घ्या वर्ल्डकपचा आनंद! पाहा बेस्ट ऑफर्स

सध्या Apple भारतात MacBook Air M2 ची विक्री किंमत 1,14,900 रुपये आहे. त्याचबरोबर या लॅपटॉपचे M1 मॉडेल अॅपल स्टोअरवर 99,900 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत 8GB RAM + 256GB SSD व्हेरिएंटसाठी आहे. मात्र सध्या यावर 5,000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. त्याचप्रमाणे 9th जनरेशनच्या आयपॅडवर 3,000 रुपये आणि 10th पिढीच्या आयपॅडवर 4,000 रुपयांची सूट दिली जात आहे. जे ग्राहक आयपॅड मिनी खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांना बँकेच्या ऑफरसह 3,000 रुपयांची सूट मिळू शकते.

शिवाय तुम्ही आयपॅड खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणि ऑफलाइन मार्केटमध्येसुद्धा उपलब्ध ऑफर तपासा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com