iPhone मध्ये 'हा' प्रॉब्लेम येतोय? Apple फ्री मध्ये करणार रिपेयर | Apple free Repair Service | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple iPhone

iPhone मध्ये 'हा' प्रॉब्लेम येतोय? Apple फ्री मध्ये करणार रिपेयर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आयफोन बनवणारी कंपनी Apple कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी विशेष सेवा देण्यात येत आहे. Apple ने ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान बनवलेल्या iPhone 12 आणि iPhone 12 Pro मध्ये ग्राहकांना जर आवाजाची काही समस्या (Sound Issue) येत असेल. जर एखाद्याला असे वाटत असेल की त्याच्या iPhone 12 आणि iPhone 12 Pro मध्ये अशी समस्या येत आहे, तर कंपनी असे फोन मोफत दुरुस्त करुन देत आहे

आयफोन फ्री मध्ये होणार दुरुस्त

Apple ने सांगितले की, जर एखाद्याचा iPhone 12 आणि iPhone 12 Pro दोन वर्षांपेक्षा जुना नसेल आणि त्यांच्या डिव्हाइसच्या आवाजात प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कंपनीच्या कोणत्याही सर्व्हिस सेंटरला भेट देऊ शकता. या फोन्समध्ये रिसीव्हर मॉड्यूल फेल झाल्यावर एका कंपोनंटमुळे वापरकर्त्यांना आवाजात समस्या जाणवत असेल तर भारतात हा प्रॉब्लेम फ्री मध्ये दुरुस्त केला जाऊ शकतो. दरम्यान तुम्ही तुमचा डिव्हाइस सर्व्हिस सेंटरला दुरुस्तीसाठी देत असाल तर फोनमधील डेटाचा बॅकअप घ्यायला विसरु नका आणि तुमच्या iPhone 12 आणि iPhone 12 Pro ची स्क्रीन तुटली असेल, तर सर्व्हिस सेंटरमध्ये हे आधीच सांगा.

हेही वाचा: मतदार ओळखपत्रात घरबसल्या अपडेट करा नवीन पत्ता, वाचा सोपी प्रोसेस

मआयफोनची वॉरंटी कशी तपासाल?

दरम्यान iPhone 12 आणि iPhone 12 Pro दुरुस्त करण्यासाठी ग्राहकांना फी भरावी लागेल. हे टाळण्यासाठी, सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्यापूर्वी, तुमच्या डिव्हाइसची मॅन्युफॅक्तरिंग वॉरंटी तपासा. वॉरंटी तपासण्यासाठी, तुम्हाला प्रोडक्ट सीरियल क्रमांक तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्यानंतर डिव्हाइसच्या सेटिंग्जवर जा. त्यानंतर General ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर About ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर checkcoverage.apple.com वर जा. त्यानंतर प्रोडक्ट सीरियल आणि विशेष कोड एंटर करा. यानंतर तुम्हाला तुमच्या डिव्हाइसची वॉरंटी स्टेटस समजेल.

हेही वाचा: Airtel चे प्रीपेड रिचार्ज प्लॅन महागले! जाणून घ्या नवीन किंमती

loading image
go to top