Apple on Sanchar Saathi App : ‘अ‍ॅपल’ने सरकारच्या ‘Sanchar Saathi APP’ 'प्रीलोड'बाबत अखेर स्पष्ट केली भूमिका!

Apple clarifies stance on Sanchar Saathi App preloading : भारत सरकारने मोबाइल कंपन्यांना त्यांच्या स्मार्टफोन्सवर ‘संचार साथी’ किंवा ‘कम्युनिकेशन पार्टनर’ नावाचे अ‍ॅप प्रीलोड करण्यास सांगितलेले आहे.
Apple clarifies its official stance on the Indian government’s Sanchar Saathi App preloading proposal, highlighting security and user privacy priorities.

Apple clarifies its official stance on the Indian government’s Sanchar Saathi App preloading proposal, highlighting security and user privacy priorities.

esakal

Updated on

Apple Responds to Sanchar Saathi App Preloading Requirement : भारत सरकारने अ‍ॅपल, सॅमसंग आणि शाओमी सारख्या कंपन्यांना त्यांच्या स्मार्टफोनवर ‘संचार साथी’ किंवा ‘कम्युनिकेशन पार्टनर’ नावाचे अ‍ॅप प्रीलोड करण्याचे आदेश दिलेले आहेत.  तर अपेक्षेनुसार Appleने सरकारचा आदेश मानण्यास नकार दर्शवला आहे.

हे संचार साथी अ‍ॅपच्या प्रीलोड करण्यास नकार दर्शवण्यामागचे कारण अ‍ॅपलने स्पष्ट केले आहे. आम्ही नकार यासाठी देत आहोत, कारण या अ‍ॅपच्या माध्यमातून कंपनीच्या iOS इकोसिस्टमसाठी असंख्य गोपनीयता आणि सुरक्षा धोके निर्माण होतात.

विशेष म्हणजे, सरकारच्या या संचार साथी अ‍ॅपचा उद्देश चोरी झालेला फोन ट्रॅक करणे, त्यांना ब्लॉक करणे आणि त्यांचा चुकीचा वापर रोखणे आहे. विशेष म्हणजे सरकारकडून आधी असं सांगितलं गेलं होतं की हे अ‍ॅप मोबाइलमधून हटवता येणार नाही, याची स्मार्टफोन निर्माती करणाऱ्या कंपन्यांनी खात्री करावी.

Apple clarifies its official stance on the Indian government’s Sanchar Saathi App preloading proposal, highlighting security and user privacy priorities.
Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

मात्र, सरकारचा हा आदेश आल्यानंतर यावर मोठ्याप्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या, शिवाय, Apple सारखी कंपनी हे मान्य करणार नाही, हेही आधीच बोलले जात होते. त्यानुसार Appleने आपला निर्णय जाहीर केला आहे. तर दुसरीकडे सरकारकडूनही आता आपल्या निर्णयात शिथिलता आणली गेली.

Apple clarifies its official stance on the Indian government’s Sanchar Saathi App preloading proposal, highlighting security and user privacy priorities.
Government Mandatory Preload APP : मोबाइल चोरी झाला, हरवला तरी 'No Tension'; सरकारी आदेशानुसार आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असणार 'हे' खास 'APP'

संचार साथी ॲपच्या मार्फत कोणतीही चुगलखोरी, जासूसी किंवा कॉल मॉनिटरिंग करता येत नाही. तसेच ज्यांना हे ॲप वापरायचे आहे ते हे ॲप ॲक्टिवेट करून वापरू शकतात; ज्यांना नाही वापरायचं ते फोनमधून काढून टाकू शकतात. वापर करण्याची कोणतीही सक्ती नाही असं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com