iPhone 12 Mini झाला स्वस्त, फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतेय बंपर सूट

iphone 12
iphone 12

सध्या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Saving Days Sale 2022) सुरू आहे. 17 जानेवारीपासून सुरू झालेल्या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर जबरदस्त डील्स देण्यात येत आहेत. Flipkartचा हा सेल 22 जानेवारीपर्यंत चालेल. दरम्यान या सेलमध्ये तुम्ही Apple चा iPhone 12 Mini 41,999 रुपयांना खरेदी करू शकता. हा Appleचा 2020 मध्ये लॉन्च झालेला स्मार्टफोन iPhone 12, Pro आणि Pro Max सह लॉन्च केला होता.  

किंमत आणि ऑफर काय आहे?

फ्लिपकार्ट सेलमध्ये हा स्मार्टफोन जवळपास 29% च्या डिस्काउंटवर उपलब्ध आहे. तुम्ही Flipkart वरून iPhone 12 Mini चे बेस व्हेरिएंट म्हणजेच 64GB स्टोरेज मॉडेल फक्त 41,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

त्याच वेळी, त्याच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे, तर 256GB व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये, ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास स्मार्टफोनवर 750 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे.

iphone 12
फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वर 17 जानेवारीपासून रिपब्लिक डे सेल! मिळेल बंपर सूट

आयफोन 12 मिनी स्पेसिफिकेशन्स

फीतर्सबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 12 मिनी ड्युअल सिम सपोर्ट (Nano + e-SIM) सह येतो. हा डिव्हाइस iOS 14 वर चालतो तसेच स्मार्टफोन मध्ये A14 बायोनिक चिपसेट दिला आहे, जे चौथ्या जनर्शनचियी न्यूरल इंजिनसह येतो. iPhone 12 mini ला 5.4-इंच सुपर रेटिना XDR OLED स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच त्याच्या संरक्षणासाठी सिरॅमिक शील्ड ग्लासचा वापर करण्यात आला आहे.

ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 12MP + 12MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याच वेळी, समोर 12MP TrueDepth सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग सपोर्ट उपलब्ध आहे. हे 5G, 4G LTE, WCDMA, GSM ला सपोर्ट करते. डिव्हाइस एका चार्जवर 15 तासांच्या व्हिडिओ प्लेबॅकसह येतो. यामध्ये मॅगसेफ वायरलेस चार्जिंगला सपोर्ट दिलेला आहे.

iphone 12
तुमचा मेल रिसीव्हरने वाचला की नाही? ही सोपी ट्रिक वापरुन घ्या जाणून

फोन विकत घ्यावा का?

जर तुम्हाला चांगली बॅटरी हवी असेल, तर हा फोन तुमच्यासाठी नाही. यात खूप लहान बॅटरी दिली आहे, जी सामान्य स्थितीतही एक दिवस टिकणार नाही. मात्र, कॅमेरा आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला ठरु शकतो, पण तुम्हाला बॅटरीशी तडजोड करावी लागेल.

iphone 12
Amazon सेलमध्ये 10 हजारापेक्षा कमीत मिळतायत बेस्ट स्मार्टफोन, पाहा यादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com