Amazon Republic Day Sale : 10 हजारापेक्षा कमीत मिळतायत बेस्ट स्मार्टफोन, पाहा यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Realme Narzo 50

Amazon सेलमध्ये 10 हजारापेक्षा कमीत मिळतायत बेस्ट स्मार्टफोन, पाहा यादी

Amazon Great Republic Day Sale 2022 : अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान अनेक डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. यामध्ये अनेक स्मार्टफोन कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट 10,000 रुपये किंवा त्यापोक्षा कमी असेल, तर तुमच्यासाठी Amazon च्या या सेलमध्ये मिळत असलेले टॉप बजेट स्मार्टफोन कोणते आहेत ते आपण पाहाणार आहोत.

या सेलमध्ये तुम्ही OnePlus, Xiaomi, Samsung, IQ, Apple या ब्रँडचे स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात. या सेलमध्ये स्मार्टफोनवर 40 टक्के सूट देऊन मोबाईल आणि अॅक्सेसरीज खरेदी करण्याचा ऑप्शन दिला जात आहे. या सेलमध्ये काही बँकांकडून 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल, तसेच नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही दिला जात आहे.

Tecno Pop 5 LTE

Amazon सेलमध्ये, तुम्ही Tecno Spark 8T, Tecno Spark 8 Pro आणि लेटेस्ट Tecno Pop 5 LTE स्वस्तात खरेदी करू शकाल. Tecno Pop 5 LTE स्मार्टफोन 6,299 रुपयां मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतु एसबीआय कार्डसह, तुम्ही 10 टक्के सूट मिळवून हा फोन 5,670 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Tecno Spark 8T

Tecno Spark 8T स्मार्टफोन 9,299 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल. जो डिस्काउंटनंतर 8,370 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि स्टायलिश मेटल डिझाइन मिळते.

Redmi 9A

7000 रुपयांच्या किंमतीत येणारा हा भारतातील नंबर 1 स्मार्टफोन आहे. फोनची किंमत 7499 रुपये आहे. पण सेलमध्ये हा फोन 6999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच, तुम्ही SBI कार्डने Redmi 9A स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्के सूट मिळवू शकता. त्यामुळे हा फोन 6299 रुपयांना खरेदी करता येईल. फोन MediaTek Helio G25 ऑक्टा-कोर प्रोसेसर सपोर्टसह येईल. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जे 2 दिवसांच्या बॅटरी लाइफसह येईल.

हेही वाचा: Amazon Republic Day Sale : 'या' टॉप स्मार्टफोनवर मिळतायत बेस्ट डील्स

Realme Narzo 50i

Realme Narzo 50i ची किंमत 2GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 7499 रुपये आहे. जो सेलमध्ये डिस्काउंटनंतर 6299 रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.5-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये मोठी 5000mAh बॅटरी दिली जाईल.

Samsung Galaxy M12

Samsung Galaxy M12 स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये 48MP क्वाड कॅमेरा सपोर्टसह येईल. फोनमध्ये 5MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ कॅमेरा दिला आहे. सेलमध्ये हा फोन 11,999 रुपयांऐवजी 9499 रुपयांना खरेदी करता येईल. या सेलमध्ये SBI कार्डवर 10 टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे. यामुळे फोन जवळपास 8550 रुपयांना खरेदी करता येईल.

हेही वाचा: Amazon वर येतोय रिपब्लिक डे सेल; स्मार्टफोन, लॅपटॉपवर मिळेल बंपर सूट

Realme Narzo 50i

Realme Narzo 50i च्या 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD Plus डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. हा फोन 11,499 रुपयांना खरेदी करता येईल. फोनच्या खरेदीवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.तसेच बँक डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन 9499 रुपयांना खरेदी करू शकाल.

Tecno Spark Go 2022

Tecno Spark G0 2022 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा डॉट नॉच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी असून फोनची किंमत 7699 रुपये आहे. जो 200 रुपयांच्या डिस्काउंट किंमतीवर खरेदी करता येईल.

हेही वाचा: फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वर 17 जानेवारीपासून रिपब्लिक डे सेल! मिळेल बंपर सूट

Web Title: Smartphones Under 10000 In Amazon Great Republic Day Sale 2022 Check List Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologyAmazon
go to top