esakal | ‘आयफोन १३’ बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयफोन १३’ बाजारात दाखल

‘आयफोन १३’ बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

क्युपर्टिनो (अमेरिका) (वृत्तसंस्था) : जगप्रसिद्ध ‘ॲपल’ कंपनीने आज ‘आयफोन १३’ हे नवीन मॉडेल लाँच केले. त्याबरोबरच ‘आयपॅड’, ‘आयपॅड मिनी’, ‘ॲपल वॉच सीरिज ७’, ‘आयफोन १३ मिनी’, ‘आयफोन १३ प्रो’ ही उत्पादने जाहीर केली. विशेषत: ‘आयफोन १३’बाबत लोकांना उत्सुकता होती. ‘कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग’ या नावाने आयोजित केलेला हा कार्यक्रम जगभरातील अनेकांनी ‘ॲपल’च्या संकेतस्थळावर आणि त्यांच्या युट्यूब चॅनेलवर लाइव्ह पाहिला.

‘ॲपल’च्या नव्य उत्पादनांबाबत जगभरातील लोकांना उत्सुकता असते. त्यामुळे कंपनीने कार्यक्रमाची घोषणा करताच संभाव्य उत्पादनांबाबत अंदाज बांधले जातात. यावेळीही अनेक उत्पादनांबाबत चर्चा झाली. ‘ॲपल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. लोकांची उत्सुकता फार वेळ न ताणता त्यांनी काही मिनिटांतच उत्पादने जाहीर केली. सुरुवातीला त्यांनी आयपॅडच्या नव्या मॉडेलची घोषणा केली. आधीच्या आयपॅडच्या चिपसेटमध्ये सुधारणा करत हे नवे मॉडेल बाजारात आणण्यात आले आहे. या वर्षात आयपॅडच्या विक्रीत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहितीही टीम कुक यांनी दिली. नवीन उत्पादनांबरोबरच ‘फिटनेस प्लस’ अपडेटही आता आणखी १५ देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आयफोन सीरिजमधील आधीच्या उत्पादनामध्ये काही बदल करत कंपनीने ‘आयफोन १३’ बाजारात आणला आहे. विशेषत: कॅमेरामध्ये बदल करण्यात आला असून काही रचनेतही थोडे बदल करण्यात आले आहेत. हा सर्वांत अत्याधुनिक ड्युएल कॅमेरा असल्याचा दावाही ‘ॲपल’ने केला आहे.

हेही वाचा: Android वरून iPhone वर असे करा कॉन्टॅक्ट ट्रान्सफर

आयफोन १३ प्रो आणि १३ प्रो मॅक्स असे नवे फोनही ‘ॲपल’ने बाजारात आणले आहेत. सिएरा ब्लू या नव्या रंगासह चार रंगात ते उपलब्ध आहेत. या फोनची बहुतेक वैशिष्ट्ये आयफोन १३ प्रमाणेच आहेत.

‘आयफोन १३’ आणि ‘आयफोन १३ मिनी’

 • सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले पाच रंगात उपलब्ध

 • २० टक्के लहान आकार सीपीयू पॉवर ६

 • २८ टक्के अधिक सुस्पष्ट (ब्रायटर)

 • ६.१ इंच स्क्रिन/ ५.४ इंच स्क्रिन

 • ए १५ बायोनिक चिपसेट, ५० टक्के अधिक वेगवान, ५ जी

 • ६ कोअर सीपीयू आणि ४ कोअर जीपीयू

 • कॅमेरा : दोन लेन्स, १२ मेगापिक्सल वाइड आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड

 • किंमत : ७९९ डॉलर आणि ६९९ डॉलर

आयपॅड

 • ट्रु टोन स्किन

 • ए १३ बायोनिक एसओसी. यामुळे क्रोमबुकचा वेग तिप्पट वाढणार आहे.

 • १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा सेंटरस्टेज सपोर्टसह.

 • ६४ जीबी स्टोरेज क्षमता. किंमत : ३२९ डॉलर

आयपॅड मिनी

 • ८.३ इंच लिक्विड रेटीना डिस्प्ले

 • ॲपल पेन्सिल सपोर्ट

 • ४० टक्के अधिक वेगवान

 • यूएसबी-सी, ५ जी.

 • पर्पल, पिंक आणि स्टारलाइट रंगांमध्ये उपलब्ध

 • १२ मेगापिक्सल रिअर आणि फ्रंट कॅमेरा

 • किंमत : ४९९ डॉलर

‘ॲपल वॉच सीरिज ७’

 • मोठी स्क्रिन

 • क्रॅक, वॉटर, डस्ट रेझिस्टंट

 • संपूर्ण दिवस चालणारी बॅटरी

 • पाच रंगांमध्ये उपलब्ध

 • स्क्रिनवर संपूर्ण किबोर्ड

 • वेगवान चार्जिंग

 • किंमत : ३९९ डॉलर

हेही वाचा: विश्‍वातील पहिले संयुग

‘पेगॅसस’ रोखणारे तंत्रज्ञान

‘ॲपल’ कंपनीने आज इमर्जन्सी सॉफ्टवेअर अपडेट प्रसिद्ध करत त्यांच्या उत्पादनांमधील कमतरता दूर केली आहे. या अपडेटमध्ये ‘पेगॅसस’लाही रोखण्याची क्षमता असल्याने यापुढे आयफोन, आयपॅड किंवा मॅक कॉम्प्युटरमध्ये घुसखोरी करणे शक्य होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. ‘ॲपल’च्या सुरक्षा यंत्रणा विकसीत करणाऱ्या गटाने रात्रंदिवस काम करत हे अपडेट तयार केल्याचे कंपनीने सांगितले.

loading image
go to top