esakal | MG Astor SUV भारतात लाँचिंगसाठी सज्ज; काय आहेत फीचर्स? वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Astor

MG Astor SUV भारतात लाँचिंगसाठी सज्ज; काय आहेत फीचर्स? वाचा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

ब्रिटिश कंपनी मॉरिस गॅरेजेस (MG) जबरदस्त फीचर्स असलेली त्यांची आणखी एक SUV MG Astor भारतात लॉंच करणार आहे. उद्या 15 सप्टेंबर रोजी ही SUV भारतीय बाजारात लॉंच करण्यात येईल आणि ही एसयूव्ही Hyundai Creta, Tata Harrier, Kia Seltos, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun यासारख्या अनेक SUV ना बाजारात जोरदार टक्कर देईल. या आधी देखील MG च्या इतर एसयूव्ही भारतात तुफान पसंत केल्या गेल्या आहेत, त्यामुळे MG Astor बद्दल चांगलीच उत्सुकता तयार झाली आहे.

एमजी मोटर्स कंपनीच्या म्हणण्यानुसार, MG Astor SUV मध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स दिसणार आहेत. तसेच या कारमध्ये काही कनेक्टेड फीचर्स पाहायला मिळतील आणि यासाठी MG ने Jio सोबत भागीदारी केली असून याचा फायदा म्हणजे, ग्राहकांना या कारमध्ये इंटरनेट सुविधा देखील मिळेल. MG कंपनीनुसार Astor च्या सर्व प्रकारांमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील दिसेल आणि ती सिस्टम Apple Car Play आणि Android Auto सपोर्टसह देण्यात येईल. तसेच या कारमध्ये 10.25 इंचाच्या डिस्प्ले देखील दिला जाईल.

हेही वाचा: स्वस्तात मिळतात 'या' सनरुफ असलेल्या कार, पाहा किंमत आणि फीचर्स

एमजी मोटर्सने अलीकडेच उघड केले आहे की, MG Astorमध्ये इंडस्ट्री-फर्स्ट पर्सनल एआय असिस्टंट (AI Assistant) आणि सेगमेंट-फर्स्ट ऑटोनॉमस लेव्हल -2 तंत्रज्ञान वापरले जाईल. या एसयूव्हीचे नुकतेच काही फोटो देखील शेयर करण्यात आले होते, ज्यामध्ये गाडीचे डीझाइन दाखवण्यात आले . त्यानुसार कंपनीच्या सिग्नेचर ग्रिलला समोर MG लोगो दिला आहे आणि LED हेडलाइट युनिट ग्रिलच्या दोन्ही बाजूला वापरल्या आहेत. त्याच्या खाली फॉग लाईट आणि बंपर शार्प लाइन्स दिल्या आहेत, ज्यामुळे गाडीला एक वेगळा लुक मिळतो. साइड प्रोफाइलबद्दल सांगायचे झाल्यास, कारला 5-स्पोक अॅलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात. तसेच ORVM वर इंडिकेटर लावले जातील. कारची टेल लाईट आणि एमजी लोगो मागील बाजूस देखील दिसू शकतो.

हेही वाचा: टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही Punch लवकरच होणार लॉंच; पाहा फीचर्स

loading image
go to top