esakal | 'Apple'चा फोन वायरशिवाय दुसऱ्या फोनला करेल 'चार्ज'; जाणून घ्या कसं?
sakal

बोलून बातमी शोधा

'Apple'चा फोन वायरशिवाय दुसऱ्या फोनला करेल 'चार्ज'

Apple iphone:अॅप्पल आईफोन 13 मध्ये खूपच लेटेस्ट फीचर्स पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये एक रिव्हर्स वायरलेस चार्जिंग फिचर सुद्धा असेल.

'Apple'चा फोन वायरशिवाय दुसऱ्या फोनला करेल 'चार्ज'

sakal_logo
By
अर्चना बनगे

Apple iphone 13 :अॅप्पल प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी देखील एक नवीन फिचर्स तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. ज्याचं नाव आहे आयफोन 13. ऑफिशियल लॉंच होण्यापूर्वी या फोन संदर्भात काही माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लिक्स रिपोर्टनुसार, आयफोन 13 मध्ये रिव्हर्स चार्जिंग चे फिचर असेल. ज्याला वायर नसेल. विदाऊट वायरचा हा फोन दुसऱ्या फोन ला आणि इयरबड ला चार्ज करू शकेल. हे फीचर फक्त त्याच फोनला चार्ज करेल ज्यामध्ये वायरलेस चार्जिंग फीचर आहे.

9 to 5 Mac च्या रिपोर्टमध्ये सुद्धा EverythingApplePRO आणि Max Weinbach हा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आईफोन नविन जनरेशन मध्ये चार्जिंग चे फिचर मिळू शकेल. जे अँड्रॉइड डिव्हाईसमध्ये सुरुवातीपासून आहे. या फिचर साठी अॅप्पल फोनला 12 सीरिजमध्ये मिळणारी मॅकसेफ वायरलेस चार्जिंग कॉईल वापरू शकतो.

हेही वाचा- G-mail वर सिग्नेचरचा समावेश करायचा असेल, तर ही बातमी वाचाच

अपकमिंग आयफोन 13 सिरीजमध्ये पहिल्याच्या मोबाईलच्या तुलनेमध्ये मोठी चार्जिंग कॅाइल असू शकते. ज्यामुळे दुसऱ्या डिवाइस ला खूप फास्ट चार्ज करण्यासाठी मदत मिळेल. कंपनीने आयफोन 12 मध्ये वायरलेस चार्जिंग साठी सुद्धा वापर केला होता.

अॅप्पल आयफोन 13 हा नवीन येणारा आयफोन सप्टेंबर मध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये आयओएस 15 काम करेल. नवीन सिरीज सारखं युजर्स ला नवीन जनरेशन नुसार चिपसेट, चांगली बॅटरी, रिफ्रेश रेट सारखा डिस्प्ले लहान आकाराचा नाॅच सुद्धा मिळू शकेल. ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा सुद्धा असेल. मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीसंदर्भात कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

loading image