esakal | G-mail वर सिग्नेचरचा समावेश करायचा असेल, तर ही बातमी वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

G-mail वर सिग्नेचरचा समावेश करायचा असेल, तर ही बातमी वाचाच

G-mail वर सिग्नेचरचा समावेश करायचा असेल, तर ही बातमी वाचाच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना, नोकरादारवर्गाला ईमेलचा (e-mail) सर्रास वापर करावा लागतो. आपले वरिष्ठ अधिकारी, प्रोफेसर, शिक्षक यांना ईमेलद्वारेच माहिती पोचवली जाते. यामुळे माहितीची देवाण घेवाण जलद होते. यादरम्यान ईमेल (G-mail) लिहून झाल्यानंतर प्रत्येकाला खालील बाजूस नाव, पद आणि धन्यवाद किंवा आभाराशी संबंधित शब्द वापरावे लागतात. यासाठी आज एक अशी गोष्ट सांगणार आहोत, जी या शब्दांना कायमच सेव्ह करुन ठेवता येईल. त्यामुळे जेव्हा पुन्हा ओपन करताना हे शब्द अॅटोमॅटीकली पहायला मिळतील. मात्र यासाठी युजर्सला (users) सिग्नेचर या पर्यायाचा वापर करावा लागेल. त्याबद्दल जाणून घेऊया..

हेही वाचा: पासवर्डशिवाय कनेक्ट करा वायफाय; फॉलो करा 'या' टीप्स

  • गूगलच्या (google) ईमेल सेवेत जीमेल सेवेचा समावेश करणे अगदी सोपे आहे. यासाठी जीमेलच्या सेटिंगमध्ये जाऊन काही बदल करणे आवश्यक आहे.

  • सुरुवातीला ब्राउजर, कंप्युटर, लॅपटॉपमध्ये जीमेल ओपन करुन घ्या.

  • ब्राऊजरमध्ये (browser) ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या साईटला सेटिंगला विकल्प करा.

  • यानंतर सी ऑल सेटिंगवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर काही नवे पर्याय दिसतील.

  • आता खाली स्क्रोल करत गेल्यानंतर तुम्हाला तिथे सिग्नेचर हा पर्याय दिसेल.

  • या बॉक्समध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार काहीही लिहू शकता.

  • यानंतर खाली दिलेल्या सेव्ह चेंज या बटनावर क्लिक करा.

हेही वाचा: हे 10 अ‍ॅप्स चोरतात फेसबुकचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड

रिप्लाय किंवा फॉरवर्डेड मेसेजवर तुम्हाला सिग्नेचर किंवा नाव नको असल्यास सिग्नेचर विकल्पच्या खाली असलेल्या लाईनवर On/Reply/Forward असे लिहले असेल. यानंतर खालील बॉक्समध्ये नो सिग्नेचरला सिलेक्ट करा.

loading image