iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेच नाहीत! काय आहे कारण?

अ‍ॅपल कंपनीला या समस्येबाबत माहिती मिळाली असली, तरी कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत सूचना दिलेली नाही.
iPhone Alarm issue
iPhone Alarm issueeSakal

iPhone Alarm : जगभरातील आयफोन यूजर्सना सध्या एक विचित्र समस्या जाणवत आहे. आपले आयफोन अलार्म वेळेवर वाजत नसून, त्यामुळे आपल्याला उठायला उशीर होत असल्याची तक्रार कित्येक यूजर्स करत आहेत. आपला अलार्म नीट काम करतोय, मात्र नेमका वाजताना त्याचा आवाज एवढा कमी होतो की आपल्याला तो ऐकूच येत नाही अशी तक्रार यूजर्सनी केली आहे.

तुम्हालाही अशीच समस्या भेडसावत असेल, तर तुम्ही एकटे नाही. जगभरातील कित्येक आयफोन यूजर्सना हाच प्रॉब्लेम जाणवतोय. आजच नाही, तर गेल्या कित्येक दिवसांपासून यूजर्स याबाबत तक्रार करत आहेत.

अ‍ॅपल कंपनीला या समस्येबाबत माहिती मिळाली असली, तरी कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत सूचना दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार या समस्येसाठी आयफोनमधील Gaze Awareness किंवा Attention Awareness हे फीचर कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय.

काय आहे हे फीचर?

आयफोनच्या या फीचरमुळे यूजर्सना नोटिफिकेशनचा आवाज कमी-जास्त करावा लागत नाही. म्हणजेच, जर फोन तुमच्या हातात किंवा चेहऱ्यासमोर असेल तर नोटिफिकेशनचा आवाज आपोआप कमी होतो. यासोबतच, यूजर्स फोनवर काही पाहत असतील तर ब्राईटनेस नियंत्रित राहण्यासाठी देखील या फीचरचा उपयोग होतो.

मात्र याच फीचरमुळे आता आयफोन यूजर्सच्या अटेंशनला मिस इंटरप्रेट करत असल्याचं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळेच अलार्म मोठ्याने वाजत नसून, अगदी कमी आवाजात वाजत आहेत.

iPhone Alarm issue
Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

तात्पुरता उपाय उपलब्ध

सध्या या समस्येवर तात्पुरता उपाय म्हणजे Attention Awareness फीचर बंद करणे. हे फीचर बंद केल्यावर अलार्म आणि इतर नोटीफिकेशन देखील आधीप्रमाणे वाजतील. मात्र, यामुळे इतर वेळीदेखील हे फीचर वापरता येणार नाही. त्यामुळेच कंपनीने यावर तातडीने ठोस उपाय करावा असं यूजर्सचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com